आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधिमंडळात आज शिंदे-फडणीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणीस सादर करणात आहेत. मात्र, आता या बजेटपूर्वी घोळात घोळ असल्याचे समोर येत आहे. त्याचे कारण असे की, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे रिक्त आहेत. अर्थ राज्यमंत्री पदावरही कोणी नाही. त्यामुळे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडणार कोण, असा पेच आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यात देवेंद्र फडणीस काय घोषणा होणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. विशेषतः बळीराजाच्या संकटावर आज विरोधकांनी सरकारला घेरले. त्यामुळे शेतकऱ्यांना काय मदत होणार, हे पाहावे लागेल.
अर्थसंकल्प सोप्या भाषेत
'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक लिहिणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देवेंद्र फडणीस यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता कोणाला नसते? तरुणाईपासून ते वृद्धांपर्यंत...शेतकरी असो की नोकरदार किंवा व्यवसायी! प्रत्येक समाजघटक त्याकडे डोळे लावून बसला असतो. पण हा अर्थसंकल्प समजून घ्यायचा कसा ❓ यावर सोप्या शब्दात एक पुस्तक लिहिले आहे. बजेट उद्या कळेलच, पण त्याआधी हे पुस्तक नक्की वाचा, असे म्हणत त्यांनी एक लिंकही दिली आहे.
मग कोण मांडणार?
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची उत्सुकता अनेकांना आहे. अनेक आमदार या विस्ताराकडे डोळे लावून बसलेत. मात्र, राज्य अर्थमंत्रीच नसल्यामुळे विधान परिषदेत दीपक केसरकर किंवा शंभूराज देसाई हे दोघांपैकी एक जण मांडू शकतात. मात्र, या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.