आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प:शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे कर्ज शून्य व्याज दरात; महिला दिनी महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, विद्यार्थिनींना बस मोफत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना योद्धा आणि सामान्य नागरिकांना श्रद्धांजली

अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली. यावेळी महाराष्ट्र कुठल्याही संकटाला झुकलेला नाही असेही अजित पवार म्हणाले. सोबतच, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना योद्धा आणि सामान्य नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. राज्याच्या या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज आणि महिलांसाठी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना या दोन महत्वाच्या घोषणा ठरल्या.

LIVE अपडेट्स

आरोग्य सेवेसाठी

  • कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवेसाठी 7500 कोटी रुपयांची तरतूद
  • रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येईल
  • वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1517 कोटी
  • आरोग्य विभागाला 2900 कोटी रुपये मंजूर
  • उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार
  • रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येईल
  • 11 परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर
  • मनपा क्षेत्रांसाठी 5 वर्षांत 5 हजार कोटी
  • लातूर जिल्हा बाह्यरुग्ण इमारतीसाठी 73 कोटी
  • ससून कर्मचारी निवास करिता 28 कोटी
  • आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय बनवणार
  • मोशीमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारणार

शेतकऱ्यांसाठी

  • शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने
  • शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले
  • कृषी पंप जोडणी धोरणासाठी 1500 कोटी रुपये देणार
  • 42 हजार कोटींचे पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट
  • विकेल ते पिकेल योजनेसाठी 2100 कोटी रुपये
  • 4 कृषी विद्यापीठांना कृषी संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी, 3 वर्षांत 600 कोटी देण्याचे निश्चित
  • 4 वर्षात बाजार समित्यांसाठी 2 हजार कोटींची तरतूद

सहकार आणि पणन

  • जलसंपदा विभागासाठी 12951 कोटी रुपयांची तरतूद
  • जलसंपदा विभागाच्या 278 कोटींच्या प्रकल्पांचे काम सध्या सुरू
  • सहकार आणि पणन विभागासाठी 1284 कोटी
  • प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या अंतर्गत 26 प्रकल्पांना 21698 कोटी
  • गोसेखुर्दसाठी 1 हजार कोटी मंजूर, डिसेंबर 23 अखेर पूर्ण करणार
  • 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी रुपये मंजूर

रस्ते, पायाभूत विकासासाठी

  • रेल्वे मार्ग विकासासाठी 16139 कोटी रुपयांची तरतूद
  • राज्यातील रस्ते विकासासाठी 12950 कोटी रुपयांची तरतूद
  • पुणे, नगर नाशिक रेल्वे विकासावर केला जाणार खर्च
  • पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
  • ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी 7500 कोटी रुपये
  • समृद्धी महामार्गाचा 500 किमीचा रस्ता 1 मे पासून खुला
  • नांदेड जालना 200 किमीचा नवा मार्ग उभारणार
  • अहमदनगर, बीड, परळी, वर्धा येथील रेल्वेमार्गांच्या कामाला वेग आणणार
  • पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव
  • समृद्धी महामार्गाचे 44% काम पूर्ण झाले
  • आपत्ती व्यवस्थापनासाठी 11315 कोटी
  • 5689 कोटी रुपयांच्या रस्ते विकासाची कामे करणार
  • ग्रामीण भागांमध्ये 10 हजार किमी रस्त्यांची कामे होतील
  • पुणे-नाशिक जलद रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी
  • पुणे-नाशिक मार्गावर 24 प्रकल्पांना मंजुरी
  • एसटी विभागाला 1 हजार 400 कोटी निधी देण्यात येणार
  • महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार
  • गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी
  • ग्रामविकास मंत्रालयासाठी 7350 कोटी रुपयांची तरतूद

महिलांसाठी

  • विद्यार्थिनी, भगिणी, कष्टकरी महिलांसाठी नवीन योजना
  • महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना
  • घर खरेदी करताना महिलांच्या नावे नोंदी केल्यास मुद्रांक शुल्कातील प्रचलित दरात 1 टक्का सवलत
  • ग्रामीण भागातील 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना प्रवास मोफत
  • महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी महिला विशेष बस उपलब्ध करून देणार
  • संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा, 250 कोटींचे बीज भांडवल
  • घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना

उद्योगासाठी

  • समृद्धी महामार्ग, नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर
  • उद्योग विभागासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद
  • 25 हजार मेगावॅटचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प
  • ऊर्जा विभागासाठी 9 हजार कोटी रुपयांची तरतूद

पर्यटनासाठी

  • महाराष्ट्राच्या नवीन पर्यटन धोरणासाठी 1 हजार 367 कोटी रुपयांची तरतूद
  • महाबळेश्वर, पाचगणी, लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार
  • वरळीच्या डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच
  • महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारले जाणार
  • सांस्कृतिक कार्य विभागासाठी 121 कोटी रुपयांची तरतूद
  • प्राचीन मंदिरांचे जतन करणार, 8 प्राचीन मंदिरांची निवड, 101 कोटी रुपये मंजूर

मद्यावरील करात वाढ

  • मद्य पेयांवरील व्हॅटमध्ये 5 टक्के वाढ करण्यात आली असून आता 65% व्हॅट लागेल
  • देशी बनावटीच्या मद्याच्या उत्पादन शुल्कात निर्मिती मूल्याच्या 220% किंवा 187 रुपये करण्यात आली
  • सर्व प्रकारच्या मद्यावरील व्हॅटचा दर 35% वरुन 40% करण्यात आले आहे

आर्थिक सर्वेक्षणानुसार अपक्षेपेक्षा 50.8 टक्के कमी महसूल

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, कृषी आणि त्यासंबंधी क्षेत्रांमध्ये 11.7% वाढीचा अंदाज, तर उद्योगात 11.3%, सेवा क्षेत्रात 9%, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात 11.8% आणि कंस्ट्रक्शन क्षेत्राच 14.6% घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नात एक लाख 56 हजार 925 कोटींची घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय, 2020-21 च्या बजेटमध्ये 3,47,457 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र एप्रिल-डिसेंबर 2020 दरम्यान 1,76,450 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, म्हणजे, अपक्षेपेक्षा 50.8 टक्के कमी महसूल मिळाला आहे.

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशापेक्षा महाराष्ट्राची कमाई अधिक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्रात प्रती व्यक्ती कमाई उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशापेक्षा जास्त असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 2019-20 मध्ये 2011-12 च्या आधारे महाराष्ट्रात प्रती व्यक्ती कमाई 2,02,130 रुपये होती. तर यूपीमध्ये 65,704 रुपए आणि मध्य प्रदेशात 99,763 रुपये होती. यावर्षी महाराष्ट्रात प्रती व्यक्ती कमाई कमी होऊन 1,88,784 कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...