आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पीय अधिवेशन:पेन्शनच्या योजनेबाबत आमचा अभ्यास सुरू, कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये, संप मागे घ्यावा, CM शिंदेंचे आवाहन

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अर्थसंकल्प सादर झाला आहे. अधिवेशनात अर्थसंकल्पासह विविध मुद्द्यांवर चर्चा होत असताना काल कांद्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले होते. तर आजपासून राज्यातील 17 लाख कर्मचारी हे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संपावर आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचा अभ्यास सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये, संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यामुद्द्यावर सरकारविरोधात आज विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते.

महत्त्वाच्या अपडेट

  • जुन्या पेन्शनवरुन विरोधक आक्रमक, विधानपरिषदेचे कामकाज तहकूब 10 मिनिटांसाठी करण्यात आले आहे.
  • सुधारित महिला धोरणावर विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समिती कक्षात बैठक सुरू आहे. महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय महिला आमदारांची बैठक सुरू आहे. सर्वपक्षीय महिला आमदारांची मते लक्षात घेणार असून धोरणात नेमके काय असणार? याचे शासनाकडून सादरीकरण सुरू आहे.
  • विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी, शेतकरी एवढ्या रणरणत्या उन्हात मोर्चा काढत आहेत. नाशिकवरुन ते पायी मुंबईच्या दिशेने चालत येत आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ या मुद्यावर मार्ग काढावा.
  • मंत्री दादा भुसे म्हणाले की, किसान सभेच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीला विविध खात्यांचे सचिव उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
  • विरोधकांनी केलेल्या अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर कृषीमंत्री सत्तार यांनी कृषी विभागाच्या निवेदन सादर केले आहे. कांदा निर्णायतीसह, कापसाच्या दरावर त्यांनी निवेदन साजरे केले. शेतकऱ्यांच्या कांदा चाळ उभारणीचे प्रयत्न सुरू असून कांदा चाळीसाठीचे अनुदान वाढविण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही सत्तार यांनी म्हटले आहे.
  • गुजरातमधील अमुलसारख्या कंपन्या आपल्या डोक्यावर बसवण्याचे काम सुरू आहे. महानंदा हे याचे उदाहरण आहे. अजुनही सरकारने जे 900 कर्मचारी रस्त्यावर येणार आहेत, याबाबत काहीही केलेले नाही. आम्ही कंपनी जाऊ देणार नसल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे म्हणाले.
  • महाराष्ट्रातील आणि देशातील भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, मोबदला असेल, की अन्य घोषणा हे खोटे आश्वासन दिले जाते, पण शेतकऱ्याला मदत केली जात नाही. त्यामुळे नाशिकपासून मुंबईपर्यंत शेतकऱ्यांचा पायी मोर्चा निघाला आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
  • आयुष्यभर लोक काम करतात त्यामुळे त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आज विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना, शेतकरी प्रश्न, किसान सभेचा लाँग मार्च या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मताचा मी असल्याचे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. ही पेन्शन शेजारीच्या तीन राज्यात देण्यात आली आहे.
  • कृषीमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात विरोधक आक्रमक; विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आले.
  • विधान परिषदेत गट नेत्यांची आज बैठक, हक्कभंग समितीच्या अध्यक्षांबाबत चर्चा होणार आहे.
  • सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी; सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन काम करायला हवे,अन्य राज्यामधे योजना लागू झाल्याने आपल्याकडेही मागणी,कर्मचारी आणि सरकारने समजूतदारपणा दाखवावा, यामुळे राज्यात विद्यार्थी, आरोग्यविभाग सर्वांनाच त्रास होईल असे अजित पवारांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा सरकारला अर्थसंकल्पात विसर पडला, असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला होता. पण, ज्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना आठवण येत आहे, असे प्रत्युत्तर अतुल भातखळकर यांनी दिले आहे.
  • आमदार नितीन देशमुख यांचे छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू, पाणी प्रश्नासाठी देशमुख आक्रमक झाले आहेत. माझ्या मतदार संघात खार पाणी आहे,, त्यासाठी पाण्याची योजना आणली होती. मात्र, या सरकारने या योजनेला स्थगीती दिली आहे. अर्धी योजना पूर्ण झालेली आहे.- आमच्या मागे काय ईडी, सीबीआय, अँन्टी करप्शन लावायचे ते लावा पण मतदारसंघातील जनतेला त्रास का देता? असा सवाल आमदार नितीश देशमुखांनी उपस्थित केला आहे.
बातम्या आणखी आहेत...