आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान, आज सभागृहात घडलेल्या एका घटनेमुळे सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
झाले असे की, सभागृहाचे कामकाज सुरू असताना विधानसभेचे काळजीवाहू अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एक सूचना वाचली. विधानसभेच्या सदस्यांना फास्टॅगचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, ही सूचना वाचताना झिरवळ यांनी सुरुवातीला फास्टॅगचा उल्लेख फॉस्टिंग असा केला. त्यानंतर झिरवळांनी उर्वरित सूचना घाईघाईत वाचून दाखवली. विधिमंडळाच्य परिसरात आमदारांना फास्टॅग लावण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे झिरवळ यांनी म्हटले. त्यावर लगेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टिप्पणी केली. 'अध्यक्ष महोदय, फास्टॅग गाड्यांना लावायचा की आमदारांना, हे स्पष्ट करा', असे फडणवीसांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
सरकार काळजीवाहूचं आहे- फडणवीस
महाराष्ट्राच्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळीच ठरला. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांना मदत आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याविषयी विधानसभा अध्यक्षांनी निर्देश घेण्याचे आवाहन केले. त्यावर अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सरकार काळजी घेईल, असे म्हटले. त्यावर सरकार काळजीवाहूचं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.