आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढती महागाई, वीजप्रश्नांनवर विरोधक आक्रमक झालेत. त्यांनी आज विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले. हे प्रश्न सोडवा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनातील प्रत्येक घडामोड जाणून घेऊयात...
- संजय राऊत यांच्या चोरमंडळ या वक्तव्याचे विधानसभेत जोरदार प्रतिसाद उमटले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यानंतर खासदार संजय राऊत यांना अटक करा अशी मागणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे.
वाचा महत्त्वाचे मुद्दे
वाचा सविस्तर संजय राऊत नेमके काय म्हणाले?
- संजय राऊत यांच्या चोरमंडळ शब्दाला शिवसेना-भाजपकडून जोरदार आक्षेप. विधिमंडळाचा अपमान झाल्याचा आरोप करत भाजप आणि शिवसेनेचे आमदार आक्रमक. कोणत्याही नेत्यांनी अशी वक्तव्ये करू नये, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन. चोरमंडळ म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही. वक्तव्य तपासून पाहावे, अशी अजित पवारांची मागणी.
- संजय राऊत यांनी चोरमंडळ म्हणणे हा विधिमंडळाचा अपमान आहे. माझ्याकडे क्लीप आहे. ते हे गुंडमंडळ म्हणाले. या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. त्यांचे प्रकरण हक्कभंगाकडे पाठवावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली. वाचा सविस्तर
- महागाईच्या मुद्दयावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहेय. शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याची मागणी करण्यात येत आहे. वीज द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्याने आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. राज्यापालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.