आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ अधिवेशन:देवस्थान जमिनीचा घोटाळा उघड करणाऱ्या तक्रारदाराविरोधात खोटा गुन्हा; जयंत पाटलांनी केली पोलखोल

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधिमंडळ अधिवेशनात आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. राज्याच्या आर्थिक विकास दरात 6.8 टक्क्यांची वाढ होईल, असा विश्वास त्यांनी या अहवालात व्यक्त केला आहे. उद्योगात 6.1 टक्के, तर कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

LIVE

- ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या हक्कभंग नोटिशीला उत्तर दिले. माझे वक्तव्य केवळ एका गटापुरते मर्यादीत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले, मी तेव्हा उत्तर देऊ शकलो नाही. दोन दिवस विधिमंडळाला सुट्ट्या होत्या. त्यामुळे आज मी उत्तर दिले आहे. मी विधिमंडळाचा अपमान हक्कभंग होईल असे विधान केले नाही. मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. हे कृपया लक्षात घ्यावे तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी, अशी विनंती त्यांनी केली...वाचा सविस्तर..

- बीडमध्ये हिंदू देवस्थानच्या जमिनीचा घोटाळा उघड करणाऱ्या तक्रारदाराविरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप बुधवारी आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केला. हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते. मात्र, उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना सभागृहात घेरले...वाचा सविस्तर...

- महाराष्ट्राचा यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला असून, राज्याच्या आर्थिक विकास दरात 6.8 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. उद्योगात 6.1 टक्के, तर कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाचा सविस्तर

- शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी सुलतानी संकटाचा सामना करत होता. त्यातच अवकाळी पावसाने भर घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर अस्मानी संकटाने घाला घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच, नाफेडची कांदा खरेदी थंडावली आहे. त्यामुळे शेतकरी आणखी हवालदिल झाला आहे. सभागृहात चर्चा करून सरकारला यावर उत्तर देण्यास भाग पाडावे, अशी मागणीही दानवे यांनी विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे केली...वाचा सविस्तर...

- छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या औरंगाबादच्या नामांतराविरोधी खासदार इम्तियाज जलील यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनात औरंगजेबाचे फलक झळकले आणि औरंगजेबाच्या नावाने घोषणाबाजी झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घोषणा देणाऱ्यांवर 'एमपीडीए' लावा अशा सूचना दिल्या आहेत. वाचा सविस्तर

- भाजप आमदार नमिता मुंदडा या आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला घेऊन आज अधिवेशनात आल्या होत्या. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या देखील आपल्या 5 महिन्यांच्या बाळाला घेऊन अधिवेशनात आल्या होत्या. नुकत्याच आई झालेल्या महिला आमदार नमिता मुंदडा या आपल्या आपल्या दोन महिन्यांच्या लेकीसह अधिवेशनास उपस्थित आहेत. केजच्या आमदार नमिता मुंदडा दोन महिन्यांचे बाळ कडेवर घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या...वाचा सविस्तर...

- केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला आहे. त्यामुळे विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला आहे.

- अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

- विधानसभेत आज केवळ अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

- काँग्रेस नेते नाना पटोले यांनीदेखील राज्यात अवकाळीमुळे बळीराजासमोर पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत आज इतर सर्व मुद्दे बाजुला करुन केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी मागणी केली.

- देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी प्रश्नावर उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, राज्यात किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले, याविषयी माहिती मागितली आहे. तसेच, पंचनाम्यानंतर तत्काळ मदतीचे प्रस्तावही मागवले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली.

- एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे आणि आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री असू नये हे कमीपणाचे वाटते. महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही, असे टीकास्त्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारवर डागले आहे. वाचा सविस्तर

- महाराष्ट्रात भांग पिऊन सत्तेवर आला आहात. भांग उतरली की सत्ता जाईल. कसबा पेठेतील जनताने भांग उतरवली आहे, असे जोरदार प्रत्युत्तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे. वाचा सविस्तर

- शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अजित पवार, छगन भुजबळ, नाना पटोले यांनी सरकारला घेरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. त्यानंतर झालेल्या नुकसानीची आकडेवारी आणि अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आणि याबाबत संध्याकाळपर्यंत सरकारचे म्हणणे मांडेल असे स्पष्ट केले. वाचा सविस्तर

- सभात्याग केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास सरकारने नकार दिला आहे. सरकारने तातडीने मदत केली नाही तर शेतकरी अक्षरश: उघड्यावर पडेल. महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. आम्हाला पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाहीदेखील अजित पवारांनी दिली. वाचा सविस्तर

- राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी छगन भूजबळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या शेतकऱ्यांच्या संसाराची होळी झाली आहे आणि इकडे नेते रंग उधळत आहेत, असा टोलाही छगन भूजबळ यांनी लगावला. आज सकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाचा सविस्तर

- महिला धोरण मंजूर होण्याची शक्यता: महिला धोरणाबाबत विधानसभेच्या कामकाजात आज आठ लक्षवेधी सूचना दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील सात लक्षवेधी मांडण्याची संधी महिला आमदारांना दिली जाणार आहे. त्यामुळे महिला आमदारांच्या सुचनांचा समावेश करून हे महिला धोरण याच अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने महिला धोरणाचा मसुदा तयार केला आहे. त्याला अद्याप विधिमंडळाची मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतर या धोरणाचे एकप्रकारे कायद्यात रुपांतर होणार आहे.

- महिला धोरणात नेमके काय? : महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी राज्य सरकार हे धोरण आखत आहे. यामध्ये महिलांविरोधात होणारी हिंसा रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय सुचवण्यात आले आहेत. या उपायांची अंमलबजावणी सरकार करेल. तसेच, स्त्री-पुरुष जन्मदर समान ठेवण्यासाठी, पुरुषप्रधान मानसिकता बदलून सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी देण्यासाठी, सर्वच स्तरावरील निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपाय या धोरणात सुचवण्यात आले आहेत.

- महाराष्ट्राचे आर्थिक धोरण जाहीर होणार: दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प उद्या 9 मार्चरोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज महाराष्ट्राचे आर्थिक धोरण सभागृहामध्ये जाहीर केले जाणार आहे. यावरुन राज्याची आर्थिक परिस्थिती स्पष्ट होईल.

- शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होणार: दरम्यान, राज्यात गेले दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा, द्राक्ष, मका, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई करावी, या मागणीसाठी विरोधक आक्रमक होणार आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन आम्ही सभागृहात आवाज उठवू, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आज शेतमालाला हमीभाव, नुकसान भरपाई, या मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

संबंंधित वृत्त

छोट्या व्यावसायिकांना बजेटकडून काय अपेक्षा?:सरकारने पर्यटन स्थळांकडे लक्ष्य द्यावे; व्यापारांना पेन्शन लागू करण्याची मागणी

सत्तातंरानंतर अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. कोरोना संकटात सलग दोन वर्ष आर्थिक फटका बसलेल्या छोट्या व्यापारांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या जाणून घेण्याचा प्रयत्न 'दिव्य मराठी'ने छत्रपती संभाजीनगरातील काही व्यापारांशी बोलून केला आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...