आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासत्तासंघर्षावर गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा होणार का ? यात कोणाकोणाची वर्णी लागणार? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय होऊ द्या मग मंत्रिमंडळ विस्ताराचे पाहू असे सांगत इच्छूकांना थोपवून धरल्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोणाला मिळणार संधी?
मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील 23 आमदारांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सहा ते सात आणि सरकारमधील सहयोगी भाजपला 16 ते 17 मंत्रिपदे मिळू शकतात.
भाजपकडून या आमदारांची चर्चा
भाजपकडून आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांची नावे चर्चेत आहेत. माढा लोकसभा मतदार संघ तसेच माळशिरस, माढा, आणि करमाळा या विधानसभेच्या मतदार संघांमध्ये ही नावे पुढे येऊ शकतात.
कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, शिंदे गटाच्या वाट्याला केवळ सहा ते सात मंत्रीपदे येणार असल्याने कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालायची आणि कोणाची समजूत काढायची असे आव्हान एकनाथ शिंदेंसमोर आहे.
कोणाला मिळणार लाल दिवा?
सोलापूर उत्तर विधानसभेचे आमदार विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत यांच्याविषयी देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.
वाहतूकमंत्री गडकरींच्या जवळ असणारे सुभाष देशमुख यांचेदेखील मंत्रीपदासाठी नाव आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी हेदेखील मंत्रीपदासाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
संबंधित वृत्त
सिंहासन कुणाला?:देशात राजकीय भूकंप घडवणारा महाराष्ट्राचा ऐतिहासिक सत्तासंघर्ष झाला कसा, पुढे काय होणार? काउंटडाउन सुरू!
देश हादरवून टाकणाऱ्या या सत्तांतराविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर जोरदार सुनावणी झाली. या प्रकरणाच्या याचिकांवर उद्या निकाल येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नेमके काय घडले, पुढे काय होणार? हे थोडक्यात जाणून घेऊ... वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.