आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला, नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे यांनी आता बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे असे विधान संजय राऊत यांनी केले होते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करायला हवे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी सांभाळायला असे ट्विट करत राणेंनी टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी आता बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल.”

संजय राऊत यांच्या या विधानावरून नारायण राणे यांनी राऊत आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला, असे नारायण राणे म्हणाले.

0