आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:कालपर्यंत मुख्यमंत्री दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असे बोलत होते, आता प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय हेडलाइन घेण्यासाठी तर नाही ना?

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज?
  • मुख्यमंत्र्यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय योग्य वेळीच घेतला आहे - राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्रात कोरोनानंतर प्रथमच प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेल्या काँग्रेसचे नेते संजय निरुपम या निर्णयावर नाराज दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय हेडलाइन मिळवण्यासाठी घेतला का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. कालपर्यंत हेच मुख्यमंत्री दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणून नागरिकांना सावध राहण्यास सांगत होते आणि आज त्यांनी मंदिरे उघडण्याबद्दल निर्णय घेतला असे निरुपम म्हणाले आहेत.

हेडलाइन मिळवण्यासाठी निर्णय घेतला का?

ट्विटरच्या माध्यमातून संजय निरुपम यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. धार्मिकस्थळे सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण दिवाळीनंतर कोरोनाची नवी लाट येणार असल्याचे मुख्यमंत्री काल-परवापर्यंत जोर देऊन सांगत होते आणि आज हा निर्णय घेतला? हा निर्णय आश्चर्यकारक वाटत नाही का? त्यामुळे हा निर्णय वृत्तपत्रांच्या हेडलाइन मिळवण्यासाठी घेतला की काय की खरंच काही प्रशासकीय धोरणही आहे, असा टोला निरुपम यांनी लगावला आहे.

प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय योग्यच, राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. सर्वच प्रार्थनास्थळांसाठी नियम एकसारखेच राहतील. सर्वांना मास्क वापरावा लागेल. सॅनिटायझर बंधनकारक राहील. सोबतच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...