आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपत्तीची माहिती:उद्धव 143 कोटींचे मालक, मात्र ‘कॅश’ रश्मी वहिनींकडे अधिक

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • उद्धव यांच्या हातात 76,922 तर रश्मींकडे 89,679 कॅश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्जासोबत आपल्या संपत्तीचीही माहिती दिली आहे. त्यांची एकूण चल-अचल संपत्ती १४३ कोटी रुपये आहे. त्यांच्या पत्नी रश्मी यांच्या नावावर एकही वाहन नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर एचडीएफसी बँकेचे ४ लाखांचे कर्ज आहे. रश्मी यांच्यावर सारस्वत बँकेचे ८ लाखांचे कर्ज आहे. दोघांकडेही मुंबईत दोन बंगले, एक फार्म हाऊस, ठाणे येथे दुकाने नावावर असून विविध कंपन्यांच्या शेअर्सवर मिळणारा डिव्हिडंड हे उत्पन्नाचे स्रोत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. रोख रकमेच्या बाबतीत मात्र मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत रश्मी यांच्याकडे अधिक पैसे (कॅश इन हँड) आहेत. 

- जमीनजुमला : खालापूर येथे उद्धव यांच्या नावावर शेतजमिनीची किंमत ९५,००० रुपये आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कर्जतमधील जमिनीची किंमत ६,४७,६७,६३५ रुपये आहे. अकोले येथे उद्धव ठाकरे यांच्या नावावर गैरशेती जमीन असून त्याची किंमत १३,६४,९४,८४६ रुपये आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावावर ठाणे येथे एक दुकान असून त्याची किंमत ३,१५,,६४,१८५ रुपये आहे 

- वांद्रे येथे दोन बंगले : कलानगर, वांद्रे पूर्व येथे मातोश्री आणि मातोश्रीच्या समोरच असलेला मातोश्री २ हे बंगले आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन्ही बंगल्यांचे ५० आणि ७५ टक्क्यांचे मालक आहेत. बाजारभावाप्रमाणे या बंगल्यांची किंमत ८१ कोटी ३७ लाख १७,३२० रुपये आहे.

- ११ कोटी ४४ लाख ३३,१०९ रुपयांची एकूण देणी रश्मी ठाकरे यांच्या नावे.

बातम्या आणखी आहेत...