आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद:'निसर्ग' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आले आहे, पण आपण त्याचा सामना करू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात येणाऱ्या चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासन या येणाऱ्या संकटासाठी सज्ज असल्याचे सांगितले. तसेच, नागरिकांनाही सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार या संकटात सोबत असल्याचेही सांगितेल.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आले आहे. हे चक्रीवादळ आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ओसरावं किंवा हवेतच नाहीसे व्हावे, अशी माझी प्रार्थना आहे. या प्रार्थनेला यश मिळेल, पण जे काही दिसत आहे ती शक्यता पाहिल्यानंतर हे वादळ 3 जूनपर्यंत आपल्या किनाऱ्यावर धडकणार आहे. किनारपट्टी आणि जवळील भागात चक्रीवादळाचा परिणाम होईल. आपण सज्ज आहोतच. NDRF च्या 15 तुकड्या आहेत. तसेच नौदल, वायुदल, लष्कर आणि हवामान विभाग या सगळ्यांमध्येही समन्वय आहे.'' 

पुढे म्हणाले की, 'आवश्यक नसेल तिथे विजेची उपकरणे वापरणे टाळा. वादळ आल्यानंतर जर वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, त्यामुळे बॅटरीवरील चालणारी उपकरणे चार्ज करुन ठेवा. या वादळाच्या संकटासाठी स्थानिक प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची गरज भासल्यास सोय केली जाईल.'

'या वादळाच्या संकटामुळे बीकेसी कोव्हिड रुग्णालयातील रुग्णांना इतर ठिकाणी हलवले आहे. वादळाने शेडला धोका झाला तर परत बांधता येईल, पण कोणाला इजा पोहोचली नाही पाहिजे. कोरोनाचं संकट रोखून त्याला परतवण्याच्या मार्गावर आहोत, आता हे वादळाचं संकटही परतवून लावू, धैर्याने त्याचा सामाना करु, संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू.'

बातम्या आणखी आहेत...