आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउनवर मुख्यमंत्र्यांचा संवाद:'लॉकडाऊन उठवला तर इतर देशांसारखी महाराष्ट्राची परिस्थिती होईल'-उद्धव ठाकरे

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 'मला कोव्हिड योद्ध्यांची गरज आहे, ज्यांना कुणाला मदतीला यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे'
 • 'मी महाराष्ट्रासाठी टीकेचा धनी होईन, मात्र मला जे योग्य वाटेल ते ते मी करणारच'
 • 'आजपर्यंत आपण 50 हजार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली'

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा अवलंबवण्यात आला आहे. तरीदेखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'जसे पंतप्रधान मोदीं म्हणतात आत्मनिर्भर बना, तसा महाराष्ट्र आत्मनिर्भर होण्यासाठी ग्रीन झोनमधल्या नागरिकांनी पुढे यावे. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी इतक्या दिवस तुम्ही घरात राहिलात आणि करोनाशी लढा दिला. अजून काही दिवस घरात राहा आणि या महामारीला रोखण्यास सरकारची मदत करा.'

ग्रीन झोनमधील नागरिकांनी पुढे यावं

पुढे ते म्हणाले की, 'आता जे उद्योग सुरु होत आहेत त्यासाठी मनुष्यबळ कमी पडल्यास ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे यावे. करोनाचा प्रादुर्भाव नाही असा ग्रीन झोन आपल्याला करोना विरहित ठेवणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे. घरात राहा आणि सुरक्षित राहा हे आपले घोषवाक्य आहे. आता ग्रीनझोनमधल्या माणसांनी मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझ्या महाराष्ट्रासाठी पुढे यावे.'

कोरोनाची साखळी मोडायची आहे

'31 मेपर्यंत देश आणि आपला महाराष्ट्रही लॉकडाउनमध्ये आहे. मी आलो की लॉकडाउनच जाहीर करतो असे तुम्हाला वाटत असेल. साहजिक आहे, किती काळ लॉकडाउनमध्ये काढणार ? याला काही उत्तर आहे का? जगात कोणाकडेच करोनाचे उत्तर नाही. युद्ध नेहमी शस्त्राने लढले जाते. मात्र इथे हातात शस्त्र नाही. अंतर ठेवणे हेच आपले शस्त्र आहे. लॉकडाउन वाढवणे हे काही अंशी नक्कीच बरोबर आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणीही संख्या वाढते आहे. मग आत्तापर्यंत काय केलं? हा प्रश्न पडलाच असेल. आपण मार्चपासून काळजी घेतो आहोत त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवू शकलो आहोत.आपण करोनाची श्रृंखला मोडू शकलेलो नाही. मात्र लॉकडाउनच्या गतिरोधकाने आपण करोनावर नियंत्रण ठेवू शकलो आहोत.'

येत्या काळात अजून शिथिलता देऊत

'येत्या काळात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये शिथिलता आणली आहे. येत्या काळात आणखी शिथिलता देणार आहोत. आजपर्यंत राज्यात 50 हजार उद्योगांना परवानगी दिली आहे. 5 लाखांच्या आसपास मजूर यामध्ये काम करत आहेत. उद्योगांसाठी काही गोष्टी जाहीर करायच्या आहेत. कारण पॉज बटण दाबले गेले आहे. ज्यामुळे जग थांबले आहे. सरकारला 6 महिने होत आहेत. त्याआधीच या संकटाला सामोरे जावे लागत आहे. एका हिंमतीने आपण पुढे जातो आहोत. नवीन उद्योग येण्यासाठी वेगळी स्पर्धा आहे. 40 हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगधंद्यांसाठी राखीव ठेवली आहे. नवे उद्योजक कदाचित जमीन खरेदी करणार नाहीत मात्र त्यांना भाडे तत्त्वावर जमिनी देऊ', असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे

 • मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार, या निश्चियाने बाहेर पडा, ग्रीन झोनमध्ये मजूर कमी पडले तर तिथे मला भूमिपुत्रांची गरज आहे
 • आपल्यासमोर दोन मोठी आवाहन आहे, ग्रीन झोन कोरोना विरहित ठेवायचा आहे, या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळला नाही
 • ग्रीन झोमध्ये एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही आणि रेड झोन ग्रीनमध्ये आणायचा आहे
 • आजपर्यंत आपण 50 हजार उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे, त्यामध्ये साधारण 5 लाख कामगार काम करत आहेत
 • ग्रीनझोनमध्ये शिथीलता आणली आहे, ऑरेंजझोनमध्ये खबरदारी घेत आहोत, मात्र रेडझोनमध्ये नाहीच
 • मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे
 • जर लॉकडाऊन केलं नसतं हे आकडे जास्त असते
 • घरात राहा सुरक्षित राहा हे आतापर्यंत पाळलं, यापुढे घराबाहेरही सावध राहा
 • हात सतत धुवत राहा, तोंडाला रुमाल, मास्क लावा, हात वारंवार चेहऱ्यावर फिरवू नका
 • हे आपल्याला पुढील काही महिने पाळावं लागेल
 • परदेशातूनही लोक आपण आणत आहोत, मात्र विलगीकरण हे आवश्यक आहे
 • तुम्हाला काही लक्षण नसली तरी तुम्ही वाहक होऊ नका
 • तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल
 • काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले
 • मजूरांकडून तिकीट घेतलेले नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च केला आहे
 • मुंबईत राहणारी पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील लोकांनाही घरी पाठवणार, पण अस्वस्थ होऊ नका
 • जे मजूर रस्त्याने चालत जात आहेत, त्यांनी कृपा करुन तो मार्ग पत्करु नये, तुमच्यासाठी रेल्वे, बसची सुविधा केली आहे
 • आहे तिथेच थांबा, तुम्हाला पूर्ण सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू
 • मजुरांची आपण काळजी घेतली, 5-6 लाख मजुरांची जेवणा खाणाची सोय केली
 • मी जर समजा हा लॉकडाऊन उठवला तर इतर देशांसारखी महाराष्ट्राची परिस्थिती होईल
 • मी महाराष्ट्रासाठी टीकेचा धनी होईन, मात्र मला जे योग्य वाटेल ते ते मी करणारच
 • लॉकडाऊन हटवणार नाही, माझ्यावर टीका झाली तर होऊदे
 • महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी टीका सहन करेन, रेड झोनमध्ये तूर्तास सूट नाही
 • रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स इतर आरोग्य सोयी सुविधा वाढवत आहे
 • राज्यभर आरोग्य सुविधा वाढवत आहोत, शक्य ती सर्व पावलं उचलत आहोत
 • डॉक्टर, नर्स, पोलिसांना त्या त्या वेळी विश्रांती देणे गरजेचे आहे
 • मला कोव्हिड योद्ध्यांची गरज आहे, ज्यांना कुणाला मदतीला यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे
 • संकट आहे, काही ठिकाणी बेड मिळत नाही अशा तक्रारी आहेत, पण त्या सुद्धा दूर होतील
 • ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या बेडची सुविधा जास्तीत जास्त करत आहे
 • रुग्णालयाबाहेर जर इतरत्र सेंटर्समध्ये सोयी सुविधा दिल्या आहेत
 • आयसीयू बेड वाढवत आहोत, इतरत्र कुठे नसेल तशी आरोग्य व्यवस्था उभी करायची आहे
बातम्या आणखी आहेत...