आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री संवाद:'कोरोनाचे संकट गंभीर असले, तरी सरकार खंबीर आहे'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता इतक्यात शक्य नाही
 • पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्राकडे मनुष्यबळाची मागणी करणार
 • मुंबईत लष्कर येणार ही अफवा, जे करेल ते तुम्हाला सांगून करेल

राज्यात सध्या कोरोना संक्रमणाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यानंतर ते आज जनतेला संबोधित करत आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, काल माझी सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत त्यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनेसाठी सूचना घेण्यात आल्या. राजकारण बाजुला ठेवून सर्व नेते एकत्र आले. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. यावेळी त्या सर्व नेत्यांनी सरकारसोबत असल्याचे सांगितले. या बैठकीत सर्व नेत्यांची चांगली एकजूट दिसली. मी त्या सर्वांचे आभार मानतो.

औरंगाबादमधील घटनेने दुखी

सकाळी औरंगाबादमधील घटनेने मी खूप दुखी आहे. जे घडले, ते खूप दुर्दैवी आहे. त्या सर्व मजुरांना भूसावळला जायये होते आणि ते सर्व ट्रेन ट्रॅकवरुन पायी चालत निघाले. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, अफवांना बळी पडू नका. ट्रेन सुरु होत आहेत म्हणून कुठेही जाऊ नका, ज्या मजुरांचा अपघात झाला ते भुसावळकडे जात होते, रेल्वेट्रॅकवरुन चालत जात होते आणि त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. आम्ही सर्व मजुरांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे. यासोबतच आपापल्या राज्यात जाऊ इच्छित असणाऱ्या मजुरांसाठी विशेष ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. तुम्हा सर्वांना योग्यरित्या आपल्या घरी पोहचवले जाईल. पण, फक्त गर्दी करू नका. आतापर्यंत तुम्ही संयमाने वागलात, महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे. घाबरुन जाऊ नका, सरकार तुमची सर्वतोपरी मदत करेल. संबंधित राज्यांना संपर्क करुन बस, ट्रेन आणि इतर साधनांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या घरी पोहचवले जाईल. 

मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार नाही

'मागील काही दिवसांपासून मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार असल्याची अफवा पसरत आहे. महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. करोनाचं संकट गंभीर असले तरीही सरकार खंबीर आहे. तुमच्या साथीने आपण या संकटावर लवकरच मात करतोल'. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मुंबईत लष्कर येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

'बाहेरील राज्यातील आपल्या नागरिकांना आपण आणणार आहोत, पण सर्व काही मोजून मापून केले जाईल. रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये अजूनही केसेस सापडत आहेत, तिथे शिथिलता इतक्यात शक्य नाही, लॉकडाऊन हा गतीरोधक आहे, पण चेन तोडायला अद्याप यश नाही.'

पोलिसांना विश्रांतीची गरज

सध्या राज्यातील सर्व यंत्रणा तणावाखाली आहे पोलिस यंत्रणेतील अनेकजण आजारी पडत आहेत, त्यांना विषाणूची लागणही होत आहे. काहींचा मृत्यू झाला, त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे. आजारी पडल्यानंतर विश्रांती देण बरोबर नाही, म्हणून त्यांची विश्रांतीपर्यंत केंद्र सरकारने अधिकचे मनुष्यबळ द्यावे.'

मुख्यमंत्र्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे

 • मजुरांनी काळजी करु नये, तुमच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून तुमच्या घरी जाण्याची व्यवस्था करत आहोत.
 • अफवांना बळी पडू नका, ट्रेन सुरु होत आहेत म्हणून कुठेही जाऊ नका.
 • बीकेसीमध्ये कोव्हिड रुग्णालय उभं राहात आहे, ते दुपटीने वाढवू.
 • मुंबईत लष्कर येणार ही अफवा, जे करेल ते तुम्हाला सांगून करेल, मुंबईत लष्कराची गरज नाही.
 • कोरोनाची साखळी तोडण्याची वेळ आहे, अनेक रुग्ण उशिराने समोर येत आहेत.
 • सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील तर स्वतःहून पुढे येऊन तपासणी करा.
 • मुंबईतील टेस्ट सुरुच राहतील, राज्यात सर्वाधिक टेस्ट होत आहेत.
 • शेवटच्या टप्प्यात रुग्ण आल्यावर उपाय कमी पडतात.
 • पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्राकडून अधिकच्या मनुष्यबळाची मागणी करणार.
 • लॉकडाऊन कितीवेळा वाढवायचा? आपल्याला चेन तोडण्यात यश आलेलं नाही, ते यश मिळवायचं आहे.
 • बाहेरच्या राज्यातील आपल्या लोकांना आणणार आहोत, पण सर्व काही मोजून मापून करणार.
 • रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता इतक्यात शक्य नाही.
 • संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे, सर्व उपाययोजना करत आहोत.
 • आपल्याला सामाजिक अंतर ठेवायचे नाही, तर शारिरीक अंतर ठेवायचे आहे.
 • लॉकडाऊन वाढवण्यात कुणाला रस नाही, पण प्रत्येकाने शिस्त राखणे आवश्यक आहे.
 • डॉक्टरांची मोठी गरज, आयुषच्या डॉक्टरांनाही या कामात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे, आयुर्वेदीक डॉक्टरांनीही सहभागी व्हावे.
 • रुग्णालयांमध्ये गलथानपणा चालणार नाही, आमच्यावर कारवाईची वेळ आणू नका.
 • राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेच, पण बरे होणाऱ्यांचंही प्रमाण अधिक आहे.
बातम्या आणखी आहेत...