आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. व्हायरसने आता बालकांनाही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाच्या आकड्यांनुसार राज्यामधून 1 ते 10 वर्षांच्या 1 लाख 47 हजार 420 मुले आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेले आहेत. मुलांमध्ये संक्रमण पसरण्याचे प्रकरण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळाले.
आरोग्य विभागानुसार, राज्यात दररोज जवळपास 500 मुले कोरोना संक्रमित आढळत आहेत. राज्यात 11 ते 20 वर्षांचे 3 लाख 33 हजार 926 बालके आणि तरुण आता व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत.
मुंबईमध्ये 1.5 ते 2 टक्के जास्त मुले संक्रमित झाले
मुंबईमध्ये बालकांमध्ये संक्रमणाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. BMC च्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आले आहे की, गेल्या वर्षी 0 ते 10 वर्षांचे 11,080 मुले कोरोना संक्रमित आढळले आहेत आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे. नायर हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक डिपार्टमेंटच्या हेड डॉ. सुषमा मलिक म्हणाल्या की, पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.5 ते 2 टक्के जास्त आहे. ज्या बालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्यातील अनेकांना निमोनिया होता. BMC कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी बालके मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त बाहेर खेळत आहेत. यामुळे ते जास्त संक्रमित झाले आहेत.
मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मुलांच्या मृत्यूची स्थिती
मुंबईच्या परेल येथील वाडिया हॉस्पिटलमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात 5 मुलांचा मृत्यू संक्रमणामुळे झाला आहे. खरेतर 2020 मध्ये केवळ 3 मुलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. पहिल्या लाटेमध्ये म्हणजेच मे-जून 2020 दरम्यान येथे 76 मुलं संक्रमित झाले होते. तर दुसऱ्या लाटेमध्ये 103 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. खरेतर वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिन्नी बोधनवाला म्हणाल्या की, या वर्षी मृत्यू दरामध्ये वाढ झालेली नाही.
अशीच काहीशी परिस्थिती मुंबई सेंट्रलच्या BYL नायर रुग्णालयात आहे. येथे 30 एप्रिलपर्यंत 43 बालके संक्रमणानंतर अॅडमिट झाले आणि एप्रिल महिन्यात 4 बालकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 नवजात बालकांचा समावेश होता आणि एकाचे वय 11 वर्षे होते. मृतांमध्ये 9 महिन्याच्या बालकाचाही समावेश होता. महालक्ष्मीमध्ये एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये पहिल्या बालकाचा मृत्यू मार्च महिन्यात झाला होता.
सायन हॉस्पिटलचे पीडियाट्रिक विभागाचे डॉ. यशवंत गबाळे यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेमध्येही पहिल्या लाटेप्रमाणे बालकांची प्रकरणे समोर येत आहेत. रोज 4-5 बालके रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र त्यांच्यात कोरोनाचे सौम्य लक्षण आढळतात. तत्काळ उपचार सुरू झाल्याने ते बरेही होतात. BMC आरोग्य विभागानुसार मार्च महिन्यात 0 ते 10 वर्षांच्या 1285 आणि 11 ते 20 वर्षांचे 4045 तरुण कोरोना संक्रमित आढळले होते.
मोठ्या व्यक्तींच्या चुकीमुळे बालकांना कोरोना
स्टेट सर्विलान्स विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये शिथिलता असल्याने लोक बाहेर येत-जात आहेत. या दरम्यान नियमांच्या उल्लंघनामुळे ते कोरोनाच्या विळख्यात सापडले. यानंतर ते कळत नकळत कुटुंबामध्ये कोरोना करिअर बनले.
लवकर रिकव्हर होतात बालके
आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये प्रकरणे वाढले आहेत. मात्र बालकांना जास्त त्रास होत नाही. KEM रुग्णालयाचे बाल रोग विशेषज्ञ डॉ. मुकेश अग्रवाल यांनी सांगितले की, मुलांची इम्युनिटी चांगली असते. बालकांमध्ये सर्दी तापेचे सौम्य लक्षणे आढळतात. 3 ते 4 दिवसांमध्ये त्यांची रिकव्हरी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.