आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिपळूण पाहणी दौऱ्यातील घटना:महिलेसोबत अरेरावी केल्याच्या वादावर भास्कर जाधव आणि महिलेची प्रतिक्रिया, महिला म्हणाली - त्यांनी अरेरावी केलेली नाही, आमचे घरचे संबंध

चिपळूण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाचासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही?

राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने अनेकांचे संसार उद्धवस्त केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी चिपळूण दौरा करत येथील नुकसानीची पाहणी केली. तसेच येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबर टाहो फोडून आपली व्यथा मांडणाऱ्या महिलेला शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अरेरावी केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये येत होते. याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. यावरुन जाधवांवर प्रचंड टीका केली जात होती. आता या प्रकरणावर भास्कर जाधव आणि चिपळूण मधील त्या महिलेनेही प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडिओमध्ये महिला मुख्यमंत्री आणि पाहणी करण्यासाठी आलेल्या नेत्यांना आपल्याला मदत करा. तसे जाऊ नका. हवे तर आमदारांचा एक दोन महिन्याचा पगार देऊ नका अशी विनंती करत होती. या महिलेला भास्कर जाधवांनी अरेरावी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही तरी काही फरक पडत नाही असे सांगत त्या महिलेच्या मुलाला आईला समजाव असे भास्कर जाधव व्हिडिओमध्ये म्हणत होते. दरम्यान या वादावर भास्कर जाधव आणि त्या महिलेने माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भास्कर जाधव म्हणाले...
या महिलेला अरेरावी केल्याच्या वादावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, 'मला यावर काहीच बोलायचे नाहीये. लोकांना मदत करणे हाच माझा प्राथमिक हेतू आहे. काल देखील मला सर्वांना मदतच करायची होती. ती महिला माझ्या मुलीसारखी होती. तिच्यासोबत किंवा माझ्या नातू किंवा भाचासारख्या असणाऱ्या मुलासोबतही मी बोलायचं नाही? आणि बोलायचे असेल तर तेसुद्धा कोणत्यातरी चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारुन बोलायचे असेल तर काम करणे कठीण होईल. मला मला बदनाम करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्याच्यावरच सोशल मीडियावर लोक तुटून पडले आहेत' असेही भास्कर जाधव म्हणाले.

चिपळूणमधील महिला म्हणाली...
मुख्यमंत्र्यांना आपली व्यथा मांडताना भावूक झालेली चिपळूणमधील महिला म्हणाली की, 'गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. ते माझ्या मुलासोबत वडिलकीच्या नात्याने बोलले. त्यावेळी मी खूप भावूक झालेले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, टीव्ही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोललं जातेय हे अजुनही माहित नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. मात्र लोकांना गैरसमज झाला.' असे चिपळूणमधील महिला माध्यमांशी बोलताना म्हणाली आहे.

बातम्या आणखी आहेत...