आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी अध्यक्षांकडून कौतुक:'या' संकटांवर देखील मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली, शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंच्या पाठीवर कौतुकाची थाप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समस्त कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक मोठे पाऊल

राज्यावर कोरोना संकट आहेच यानंतर लगेच पावसाचे संकट उद्भवले. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येत आहेत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिंमत दाखवली आहे असे म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती. येथे बोलतानाच शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे.

शरद पवार बोलताना म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सातत्याने काहीना काही संकटे उद्भवत आहेत. आता एक मोठे अतिवृष्टीचे संकट राज्यावर आले. हजारो घरे कोलमडली. हजारो घरांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांचे होते नव्हते ते सर्व वाहून गेले, सर्व काही खराब झाले आहे. पण एक गोष्ट चांगली आहे, की या संकटांवर देखील मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली.' अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज जाहीर कौतुक केले आहे.

बीडीडी चाळीविषयी बोलताना पवार म्हणाले की, 'एका बाजूने या पूरग्रस्त भागांमधील घरांची बांधणी करण्याचे आव्हाण आहे. तर दुसऱ्या बाजूने समस्त कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक मोठे पाऊल पडत आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक भाग आहे. हा सगळा परिसर याचा इतिहास नुकताच एका ग्रंथाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला गेला आहे. बीडीडी चाळ व या सर्व परिसरात एक दृष्टीने देशाचाच इतिहास घडला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे यांचे या भागात वास्तव्य होते.'

बातम्या आणखी आहेत...