आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना योद्धा:तीन महीन्यांपासून रुग्णालयात सेवा देणाऱ्या दिव्यांग राजू चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात सरकारने दिव्यांगांना कामावर येण्यास सूट दिली आहे

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये टेलीफोन ऑपरेटर पदावर काम करणारे राजू चव्हाण मागील दोन महिन्यांपासून एकही सुट्टी न घेता काम करत आहेत. मुंबईत कोरोना महामारीमुळे अनेक डॉक्टर्स आपले क्लिनीक बंद करत आहेत, अशा परिस्थितीत राजू यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामाबद्दल माहिती झाल्यावर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी त्यांना फोन करुन धन्यवाद दिले.

'मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर माझी जबाबदारी अजून वाढली'

मुख्यमंत्री राजू यांना म्हणाले- 'तुमचे काम सर्वांचे प्रोत्साहीन वाढवणारे आहे. तुम्ही तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या.' मुख्यमंत्र्याच्या फोननंतर राजू म्हणाले की,"पहिल्यांदा मी शॉक्ड झालो होतो. मला विश्वास बसत नव्हता की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्याशी बोलत आहेत. मी खूप खुश झालो, जेव्ह त्यांनी स्वतः आपला परिचय दिला. सर्वात आधी त्यांनी आपले नाव सांगितले. नंतर म्हणाले की, अभिनंदत राजू तुम्ही दिव्यांग असूनही महान काम करत आहात. मला हे ऐकून खूप आनंद झाला.'

कठी परिश्रम करुन ऑफीसमध्ये येतात

सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये टेलीफोन ऑपरेटरच्या पदावर काम करणारे 44 वर्षीय राजू यांनी 2009 मध्ये नोकरी जॉइनट केली होती. ते दररोज हॉस्पीटलच्या बसमधून कामावर येतात आणि 9-10 तास ड्युटी करतात. परंतू, परत घरी जाण्यासाठी ते एका बसमधून दादरला जातात, तिथून अंधेरीसाठी दुसरी बस पकडतात. नंतर अंधेरी पश्चिममधून पूर्वेकडे जातात आणि नंतर तिसऱ्या बसमधून घरी जातात.

0