आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सचिवाला धमकी:मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकरांना संदेश पाठवून धमकी, मागण्या मान्य केल्या नाही तर ED, CBI किंवा NIA ची चौकशी मागे लावू

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना अज्ञात व्यक्तीने संदेश पाठवून धमकी दिली आहे. नार्वेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

मुंबई पोलीस सहआयुक्त (क्राईम) मिलिंद भारंबे म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना एका अज्ञात नंबरवरुन व्हॉट्सअॅप मॅसेज मिळाला. ज्यामध्ये त्यांना धमकी देण्यात आली आहे, की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्यांच्याविरुद्ध सीबीआय, ईडी, एनआयए आणि इतर केंद्रीय संस्थांकडून कारवाई केली जाईल.

नार्वेकर यांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, 'मला शंका आहे की शिवसेनेचे जे लोक महत्त्वाच्या पदांवर आहेत त्यांना लक्ष्य केले जात आहे.' त्यांनी पोलीस तक्रारीत संशयिताने पाठवलेल्या मागणीची माहितीही दिली आहे. या तक्रारीबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

पुण्यातून एका व्यक्तीला अटक

यापूर्वी, महाविकास आघाडी सरकारच्या इतर अनेक नेत्यांनी देखील दावा केला होता की महाराष्ट्र सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सीकडून कारवाईच्या धमक्या मिळत आहेत. पुण्यात एका व्यक्तीला अटक केल्यानंतर दोन दिवसांनी ही तक्रार आली आहे.

अटक केलेल्या व्यक्तीवर महाराष्ट्र मंत्रालयाच्या (सचिवालय) अधिकाऱ्यांना फोन करून स्वतःला शरद पवार म्हणत असल्याचा आरोप आहे. स्वतःला शरद पवार असल्याचे सांगून त्या व्यक्तीने दुसऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीबाबत अधिकाऱ्याशी बोलले होते.

बातम्या आणखी आहेत...