आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोलेंची टोलेबाजी:आमचे मित्र बिचारे फडणवीसजी आधी पोलिस कमिशनर होते, आता 'डीसीपी' झालेत!

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमचे मित्र देवेंद्र फडणवीस हे बिचारे गेल्या 2014 च्या सरकारमध्ये पोलिस कमिशनर होते. म्हणजेच प्रमुख होते. पण आता त्यांना 'डीसीपी' बनवले. फार अपमान केला त्यांनी आमच्या मित्राचा. तसेच त्यांना शपथ घेतल्यानंतर 40 दिवस खातेच दिले नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. रत्नागिरीतील चिपळूनमध्ये ते एका सभेला संबोधित करत होते.

भाजपचे केंद्रीय मंत्रीच नितिन गडकरी सरकारवर विश्वास ठेवू नका, सरकारकडून अपेक्षा बाळगू नका आणि तुमचे काम तुम्हीच करा, असे म्हणत आहेत. मग त्यांना मी विनंती केली की, केंद्र सरकारच्या विरोधात तुमचे आणि आमचे दुखने सारखेच आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत येऊन जा, असे नाना पटोलेंनी सांगितले. पुढे नाना पटोले यांनी सांगितले की, राज्यात 2019 मध्ये पहाटेच सरकार आले. पण, 74 आताच्या तास त्यांचा घटस्फोट झाला. मग राज्यात राजकीय विपरित परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मविआ सरकार स्थानप झाले. तेव्हा सोनिया गांधींच्या सांगण्यावरून मविआने एका वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. आणि आता मविआ सरकार पाडून राज्यात ईडीचे सरकार आले आहे. अजून पालकमंत्री झाले नाहीत.

जनतेच्या मुळ प्रश्नांकडे दुर्लक्ष

पुढे ते म्हणाले की, भाजप महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करत आहे. तसेच काँग्रेसचे नेते पळवणार असे दावे ते करत आहेत. पण, जनतेच्या मुळ प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...