आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील रिकव्हरी रेट 90.46 वर, बरे होणाऱ्या रुग्णांचा संख्या 15 लाख 31 हजार पार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के, सध्या 1 लाख 16 हजार 593 रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात मंगळवारी 4909 नवीन रुग्ण आढळले. तर 120 जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे 6973 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासोबत राज्यातील एकूण रुग्णसंख्या 16 लाख 92 हजार 693 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 15 लाख 31 हजार 277 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 90.46 टक्क्यांवर गेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 44 हजार 248 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.61 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 593 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा आलेख घसरत असला हे दिलासादायक असलं तरी बिनधास्त होऊन चालणार नाही. मास्कचा सक्तीने वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या 3 गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं तर कोरोना दूर राहू शकतो. यात हलगर्जीपणा झाला तर दुसरी लाट येऊ शकते असा इशाराही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.