आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:बुधवारी एका दिवसातील सर्वाधिक 3 हजार 254 रुग्णांची नोंद, तर 149 रुग्णांचा मृत्यू

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो मुंबईतील आहे. बस पकडण्यासाठी लागलेली लांब रांग. - Divya Marathi
हा फोटो मुंबईतील आहे. बस पकडण्यासाठी लागलेली लांब रांग.

बुधवारी रात्री जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासात 3 हजार 254 नवीन संक्रमित रुग्ण आढळले तर 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आतापर्यंतचा एका दिवसातील संक्रमितांचा आणि मृतांचा सर्वात मोठा आकडा आहे. महाराष्ट्रात आता रुग्णसंख्या 94 हजार 041 आणि मृतांचा आकडा 3 हजार 438 झाला आहे. तर, मुंबईमध्ये 24 तासात 1, 567 नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तर 97 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत 52 हजार 667 आणि 1,857 मृत्यू झाले आहेत.

आयुर्वेदिक, होम्योपॅथी आणि यूनानी औषधोपचारासाठी राज्य सराकरीच मंजुरी

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आयुर्वेदिक, होम्योपॅथी आणि यूनानी औषधोपचार पद्धतीला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने 'टास्क फोर्स ऑन आयुष फॉर कोविड-19' स्थापन केले होते. या टास्क फोर्सने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना लवकर ठीक करण्याचे दिशा-निर्देश दिले होते, ज्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. विशेष निर्देशांमध्ये सांगण्यात आले आहे की, रुग्णांना ताजे, गरम, हलके आणि सुपाच्य भोजन द्यावे. अन्नात कडधान्या आणि भाजीपाळा घ्यावा. निर्देशात स्पष्टपणे सांगितले आहे की, या औषधांना फक्त वैद्य, होम्योपॅथी आणि यूनानी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे.

महाराष्ट्र विधीमंडळाचे मानसून सत्र ऑगस्टपर्यंत लांबणीवर

सरकारने विधीमंडळाचे मानसून सत्र 3 ऑगस्टपर्यंत टाळण्याचा निर्णय घेतला आहे. हे सत्र आधी 22 जूनपासून सुरू होणार होते. सरकारी सूत्रांनी सांगितले की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे सत्र स्थगित करण्यात आले आहे. पुढे होणारे सत्र हे चार ते पाच दिवसांचे असून, ते मुंबईत होईल. अंतिम निर्णय दोन्ही सदनाच्या बैठकीनंतर बुधवारी घेतला जाईल.

निर्णयाला विरोधी पक्षाचा पाठिंबा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला, शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखादं दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे - देवेंद्र फडणवीस

 ठाण्यात मागील दोन दिवसात दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईजवळील ठाण्यात मागील दोन दिवसात दोन नगरसेवकांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे शिवसेनेच्या एका नगरेवकाने आपली जीव गमावला आहे. यापूर्वी मीरा भायंदर नगर पालिकेतील एका 55 वर्षीय नगरसेवकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...