आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:संक्रमितांचा आकडा 1 लाखांच्या पुढे; जगातील 198 देशांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह महाराष्ट्रात

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकडाउनमध्ये सूट मिळाल्यानंतर गुरुवारी मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर मोठी गर्दी झाली. - Divya Marathi
लॉकडाउनमध्ये सूट मिळाल्यानंतर गुरुवारी मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर मोठी गर्दी झाली.
  • मागील 3 दिवसात 10 हजार संक्रमित वाढले

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाखांच्या पुढे गेला आहे. मागील 24 तासात 3,493 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 1 लाख 1 हजार 141 झाला आहे. मागील 24 तासात 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील एकूण मृतांचा आकडा 3 हजार 717 झाला आहे. चांगली बाब म्हणजे, राज्यातील आतापर्यंत 47 हजार 796 संक्रमित ठीक झाले आहेत.

मागील 3 दिवसात 10 हजार संक्रमित वाढले

मागील तीन दिवसात महाराष्ट्रात 10 हजार 354 नवीन संक्रमित सापडले. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, जगातील 198 देशांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह महाराष्ट्रात आहेत. मुंबईत मागील 24 तासात 1,366 नवीन संक्रमित आढळले तर 90 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 

यावर्षी शालेय फी वाढणार नाही

लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिकवल्यामुळे वापरल्या जात नसलेल्या शाळांच्या सुविधांसाठी फी वसूल करू नये अशा सूचना राज्य शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिल्या आहेत. कार्यकारी पालक शिक्षक संघटनेने (आयपीटीए) यासंदर्भात प्रस्ताव मंजूर करावा, असे विभागाने म्हटले आहे. 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी कोणतीही फी वाढविली जाऊ नये, असे शासन आदेशात म्हटले आहे. हा आदेश सर्व बोर्डांना आणि पूर्व माध्यमिक ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्व माध्यमास लागू असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...