आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांचा आकडा वाढत आहे. राज्यात मंगळवारी 2,259 नवीन रुग्ण सापडले आहेत. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा आकडा 90 हजार 787 झाला आहे. यातील 44 हजार 849 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी राज्यात 120 रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत व्हायरसमुळे 3,289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे. शहरात सध्या 51 हजारांच्या आसपास रुग्ण आहेत. तसेच, आतापर्यंत 1760 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बीएमसीच्या उपायुक्तांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचा संशय
बृहन्मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा आपल्या निवासस्तानी मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू, बीएमसीने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिली नाही. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे.
बीएमसी कमिशनरचा दावा - कोरोना रिपोर्ट देण्यासाठी काही प्रयोगशाळांना 18 दिवस लागले
मुंबईतील काही प्रयोगशाळांना कोरोनाचा रिपोर्ट देण्यास 18 दिवस लागले असल्याचे बीएमसीचे आयुक्त आयएस चहल यांनी सांगितले. 4 एप्रिल रोजी घेतलेल्या नमुन्याचा रिपोर्ट 22 एप्रिल रोजी देण्यात आल्याचे माहीत झाल्याचे ते म्हणाले. चहल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, "काही प्रयोगशाळा 18 दिवसांनंतर रिपोर्ट देऊन गंभीर गुन्हा करत आहेत. यासाठी त्यांना शिक्षा होऊ शकते."
शिक्षकांना देखील ऑनलाइन ट्रेनिंग
गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा ऑगस्टपर्यंत सुरू न करण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. आता शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा विस्तार केला जाईल. याची अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारपासून शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाले आणि मुंबईतील 3 हजारपेक्षा जास्त शाळांमधील सुमारे 20 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण एन.एम.सी. च्या वतीने सर्व शिक्षक, प्राचार्य व एन.एम.सी. शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे अधिकारी यांना त्यांचे प्रशिक्षण व शैक्षणिक व तांत्रिक कौशल्यांचा विकास ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे करता येतो. पश्चिम उपनगर आणि मुंबई शहरातील शिक्षक अनुक्रमे 9 जून आणि 10 जून रोजी या कार्यक्रमात भाग घेतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.