आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज 1 हजार 165 नव्या रुग्णांची नोंद, रुग्णसंख्या 20 हजार 228 वर; 48 जणांचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात शुक्रवारी 1089 नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 हजार 63 वर

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार गेला आहे. आज दिवसभरात राज्यात 1 हजार 165 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासोबत राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 20 हजार 228 वर पोहोचला आहे. आज राज्यात कोरोनामुळे 48 रुग्णांचा मृत्यू झाला तर 330 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित ‘जी’ दक्षिण प्रभागांतर्गत येणाऱ्या वरळी आणि डिलाइरोड बीडीडी चाळला 8 दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याची तयारी केली जात आहे. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संमतीने मुंबई पोलिसांना पत्र लिहिले आहे. हा प्रयोग वरळीमध्ये यशस्वी झाल्यास मुंबईच्या इतर भागातही राबविला जाईल, असे महापौरांनी सांगितले. त्यात धारावी, मानखुर्द, वडाळा अशा भागांचा समावेश आहे.

राज्यात शुक्रवारी पुन्हा एकदा नव्या कोरोनाग्रस्तांनी एक हजारचा टप्पा पार केला. राज्यात शुक्रवारी 1089 नवे रुग्ण, तर 37 मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 हजार 63 वर गेली आहे. शुक्रवारी 169 कोरोनाग्रस्त बरे झाले. एकूण कोरोनामुक्तांचा आकडा 3470 वर गेला आहे.

नाशिकमध्ये कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

कोणार्क नगर येथे आढळून आलेल्या पहिल्या 51 वर्षीय कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्याचा आज मृत्यू झाला. नाशिक शहरातील कोरोनाचा दुसरा तर जिल्ह्यातील 20 वा मृत्यू ठरला आहे.

आयआरबीच्या 73 जवानांना कोरोनाची बाधा

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या हॉटस्पॉट क्षेत्रात दीड महिने कर्तव्य बजावल्यानंतर औरंगाबादला परत आलेल्या भारतीय राखीव बटालियन (एसपी-बल क्रमांक 14) च्या 73 जवानांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान जवानांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांना प्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीत ठेवले आहे. यापैकी जणांना जालना रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संक्रमित जवानांच्या संपर्कात येणार्‍या 4 अधिकारी आणि 21 जवानांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.

कोरोना अपडेट्स 

औरंगाबाद : आज शहरात 30 नवे कोरोना रुग्ण आढळले. यासोबत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 508 वर पोहोचली आहे. तर आज 22 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी येथे 100 रुग्ण समोर आले होते. 

मुंबई : राज्य सरकारने प्रत्येक रस्त्यावर पाच दुकाने उघडण्याची परवानगी रद्द केल्यानंतर आता महापालिकेने प्रत्येक लेनमध्ये एक हार्डवेअर आणि एक इलेक्ट्रॉनिक दुकान सुरू करण्याची परवानगी दिली आहे. महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या संदर्भातील सर्व 24 प्रभाग अधिकाऱ्यांना अधिकार दिले की, हार्डवेअर व इलेक्ट्रॉनिक दुकाने उघडण्यासाठी अर्ज मागवून परवानगी द्यावी.

नवी मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे वाशी एपीएमसीच्या पाच घाऊक मंडई 11 ते 17 मे दरम्यान बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. येथील सर्व मंडईंमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 125 पेक्षा जास्त झाली आहे.

पुणे : कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाचे पथक शुक्रवारी पुण्यात दाखल झाले. जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या 2,400 च्या पार झाली आहे. 

अंत्यसंस्कारात 20 लोक उपस्थित राहू शकतात पण दारूच्या दुकानात हजारो लोक येतात

कोरोना संकट आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारने दारू विक्रीवरील बंदी शिथिल केल्याच्या काही दिवसांनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधान केले आहे. राऊत यांनी ट्वीट केले की, अंत्यसंस्कारात फक्त 20 लोकांना हजर राहण्याची परवानगी दिली जाते. मात्र दारुच्या दुकानांवर 1000 लोकांना येण्याची परवानगी आहे. 

बातम्या आणखी आहेत...