आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारचा महत्त्वाचा निर्णय:ठाकरे सरकारने आवश्यक वस्तू आणि सेवा दुकानांबाबत नवीन अध्यादेश केला जारी, सकाळी 7-11 या वेळेतच सुरू राहतील अत्यावश्यक सेवा

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल

राज्यातील कोरोना परिस्थिती ही गंभीर होत असताना दिसत आहे. दरम्यान आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. किराणा दुकाने, दूध, भाजीपाला दुकानांमध्ये गर्दी होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सरकारने या दुकानांची वेळ कमी केली आहे. या नियमानुसार आता अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान आणि इतर दुकाना या सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. राज्य सरकारने याविषयी एक अध्यादेश जारी केला आहे.

'राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील. मात्र या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.' असे सरकारने आपल्या अध्यादेशात म्हटले आहे.

नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, दारुची दुकाने, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, शिकवणी किंवा ट्यूशन पूर्णपणे बंद राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...