आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे खडेबोल:आंदोलने करायची तर करा पण कोरोनाविरुद्ध करा, आपण राजकारण करतो पण जीव सामान्य जनतेचा जातो; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिरांवरुन विरोधकांना खडेबोल

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली होती. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी आणि उपस्थित डॉक्टरांशी संवादही साधला. यावेळी बोलत असताना राज्यभरात विविध निर्बंध शिथिल करण्यासाठी जी आंदोलन होत आहेत, त्यावरुन विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात अनेकजणांकडून घाई-घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह केला जात आहे. मात्र ही घाई सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवू शकते. हे आपल्या सर्वांचे राजकारण होते, पण जीव जनतेचा जातो. असे व्हायला नको. जनतेच्या जीवाशी खेळू नका' असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

मंदिरांवरुन विरोधकांना खडेबोल
तसेच पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, अनेकांनी राज्यामध्ये मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलने केली. तुम्हाला आंदोलने करायची तुम्ही अवश्यक करा, मात्र हे आंदोलन कोरोनाविरुद्ध करा. सध्या सणवाराचे दिवस सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आपण अनेक गोष्टी खुल्या केलेल्या आहेत. मागच्या वर्षी सणवार झाल्यानंतर दुसरी लाट आली होती. यावर्षी तर आधीच रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे गर्दी होऊ नये यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी.

बातम्या आणखी आहेत...