आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राज्य सरकारने आता तेथून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची RT PCR चाचणी करणे अनिवार्य केले आहे. केरळहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमातळावरच आपली कोविड-19 रिपोर्ट दाखवावा लागेल आणि ज्या प्रवाशांनी रिपोर्ट सोबत आणला नाही त्यांची विमातळावरच चाचणी केली जाईल. राज्य सरकारच्या महामारी रोग अधिनियम 1897च्या कलम 2 अंतर्गत आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत 23 नोव्हेंबर 2020 रोजी जारी केलेल्या एसओपीला कायम ठेवले आहे.
याआधी राज्य सरकारने दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून येणाऱ्या हवाई प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली होती. गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आरटी-पीसीआर देखील 72 तासांच्या आत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रेल्वे आणि बसने येणाऱ्या प्रवाशांचीही होणार चाचणी
हाच नियम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही लागू आहे, मात्र त्यांचा रिपोर्ट 96 तासांच्या आत द्यावा लागेल. जर एखाद्या प्रवाशाकडे रिपोर्ट नसेल तर स्थानकावरच त्याची चाचणी केली जाईल, यादरम्यान जर त्यास विषाणूची लागण झाल्याचे आढळले तर त्याला त्वरित कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाईल आणि त्याचा खर्च देखील प्रवाशालाच करावा लागेल. रस्तेमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही अशाप्रकारची नियमावली लागू असणार आहे.
रिपोर्ट दाखवण्याचा नियम कोणत्याच राज्यात नाही तर मग महाराष्ट्रातच का? : कोटक
ईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी सरकारच्या नवीन नियमांवर म्हटले की, देशाच्या कुठल्याही राज्यात येण्यावर कोविड-19 चा रिपोर्ट मागितला जात नाही तर मग महाराष्ट्रात असे का केले जात आहे. अशा नियमांमुळे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांचा वेळ वाया जातोच, तसेच व्यवसायावरही याचा मोठा परिणाम होतो, असेही कोटक म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.