आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Corona | Governor Bhagat Singh Koshyari Commits Himself To Quarantine After Meeting Corona Positive Staff At Raj Bhavan, 16 Employees Likely To Be Infected

राजभवनात कोरोना:राजभवनातील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी, 16 कर्चमारी कोरोना पॉझिटिव्ह, 45 जणांचा अहवाल येणे बाकी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो
  • राजभवनातील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट केली होती, यातील 55 जणांचा रिपोर्ट आला आहे

महाराष्ट्र कोरानाने कहर केला आहे. हा कोरोना आता राजभवनात देखील पोहोचला. राजभवनातील एक कनिष्ठ इलेक्ट्रिशियन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. येथील एकूण 100 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यापैकी 55 ते 57 जणांचा रिपोर्ट आला आहे. यातील जवळपास 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. सध्या इतरांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. यामुळे राजभवनातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

राज्यात आतापर्यंत 2 लाख 46 हजार पॉझिटिव्ह रुग्ण 

राज्यात रविवारी सकाळपर्यंत कोरोनाची 8139 नवीन प्रकरणे आढळली. मागील 24 तासांत कोरोनामुळे 223 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2,46,600 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. सध्या राज्यात 99 हजार 202 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 4360 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 1.36,985 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत 10,116 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

मुंबईत 91 हजार पार पोहचला संक्रमितांचा आकडा 

मुंबईत शनिवारी कोरोनाचे 1,308 प्रकरणे आढळली. यासोबत शहरातील एकूण रुग्णसंख्या 91,457 झाली आहे. बीएमसीनुसार, शहरात 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येथील एकूण मृतांचा आकडा 5,241 वर पोहचला आहे. 

मुंबईत आतापर्यंत 63,431 रुग्ण बरे झाले 

बीएमसीनुसार, दिवसभरात 1,497 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत शहरात 63, 431 रुग्ण बरे झाले आहेत. बीएमसीने म्हटले की, मुंबईत आतापर्यंत 22,779 रुग्णांवर उपचार सुरू आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 50 दिवसात दुप्पट होत आहेत.

0