आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता:राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील होण्याची शक्यता, उद्योजकता वाढवण्यासाठी सरकार घेऊ शकते महत्त्वाचा निर्णय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सक्रिय कोरोना रुग्णांचा दर एक टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या 14 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. रुग्णसंख्याही बरीच कमी झाली आहे. असे असले तरीही राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आलेली नाही. आता राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध पूर्णतः काढले जाण्याची शक्यता आहे. उद्योजकता वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्णदर 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे, अशा जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णतः शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असे 14 जिल्हे आहेत. त्यांची यादी आरोग्य विभागाकडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आलेली आहे. राज्यातील उद्योजकता वाढवण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवरच सरकार हा निर्णय घेणार आहे.

सक्रिय कोरोना रुग्णांचा दर एक टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या 14 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण सलग तीन आठवड्यांपासून 1 टक्क्यांच्या खाली असेल, अशा जिल्ह्यांना हा दिलासा दिला जाणार आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासोबतच उद्योजकता वाढावी, यासाठी हा निर्णय घेण्यात यावा यासाठी हा निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यांची यादी लवकरच निश्चित करण्यात येईल आणि ती जाहीर केली जाईल अशी माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...