आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विस्फोट:दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळांच्या स्टाफमध्ये कोरोनाची एंट्री, अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. अनेक मंत्री आणि आमदारांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घर आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या घरात आणि कार्यालयात काम करणाऱ्या 20 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात आणखी काही कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

यासोबतच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील आणि बंगल्यावरील 22 जणांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या 2 दिवसांपासून रामटेक बंगल्यावर कोविड चाचणी केली जात होती. यानंतर कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल आज समोर आले आहेत.

दरम्यान मुंबईत गेल्या 24 तासांच्या दरम्यान 29 हजारांपेक्षा जास्त कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. अशा वेळी पूर्णतः लॉकडाऊनच्या चर्चांमुळे प्रवासी आणि विशेषतः मजूर खूप घाबरलेले आहेत. गुरुवारी रात्रीपासूनच मुंबईच्या लोकमान्य टिळक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होती. तिसऱ्या लाटेच्या भितीने आपापल्या घरी परतण्यासाठी लोक कसे प्रयत्न करत आहेत, हे आम्ही जाणून घेतले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अचानक लॉकडाऊन लागल्यानंतर मोठ्या शहरांमधून घरी परतणाऱ्या स्थलांतरितांचे हृदयपिळवटून टाकणारे फोटोज आपण सर्वांनी पाहिले आहेत. महामारीच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा असेच दृश्य पाहायला मिळत आहे. मुंबईत लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजुरांनी रेल्वे स्थानकावर तळ ठोकला आहे. लॉकडाऊनच्या आधी आपापल्या गावात आणि घरापर्यंत पोहोचायला हवे असा सर्वांचा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...