आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि रिकव्हरी रेटही वाढत चालला, 12.29 लाख कोरोनामुक्त

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी दिवसभरात 12,134 नवे रुग्ण तर 302 मृत्यूची नोंद

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि रिकव्हरी रेटही वाढत चालला आहे. शुक्रवारी १७,३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १२ लाख २९,३३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ८१.६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात १२,१३४ नवे रुग्ण तर ३०२ मृत्यूची नोंद करण्यात आली.

राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता १५ लाख ६,०१८ तर बळींचा आकडा ३९,७३२ वर गेला आहे. राज्यात सध्या २ लाख ३६,४९१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्युदर २.६४ टक्क्यांवर गेला आहे.

२३,५८८ व्यक्ती होम क्वॉरंटाइनमध्ये
राज्यभरात सध्या २३,५८८ व्यक्ती होम क्वॉरंटाइनमध्ये आहेत. दुसरीकडे, २४,९७२ जणांना संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. राज्यात ७४ लाख ८७,३८३ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी २०.११% जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser