आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:संक्रमितांचा आकडा 2.75 लाखांवर; बुधवारी 7,975 नवीन रुग्णांची नोंद तर 233 मृत्यू

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत राज्यातील 1 लाख 52 हजार 613 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत राज्यात तब्बल 95 हजार 343 रुग्णांची भर पडली आहे. म्हणजेच दररोज सरासरी 6,240 रुग्ण वाढत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात 15 दिवसांत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 59 हजार 459 ने वाढला आहे. म्हणजेच दररोज सरासरी 3,990 रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 1 लाख 11 हजार 801 झाला आहे.

राज्यात बुधवारी 7,975 रुग्णांची वाढ झाली तर 233 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 2 लाख 75 हजार 640 झाला असून 10,928 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,11,801 रुग्णांवर उपचार सुरू असून 1,52,613 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी 6,741 रुग्णांची नोंद झाली होती तर 213 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच, मंगळवारी 4,500 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

मृत्यूसंख्येत राज्याचा वाटा 44.62 टक्के

महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या झाल्या हा दावा चुकीचा आहे, मृत्यू संख्येत राज्याचा वाटा 44.62 टक्के इतका भीषण आहे. अजूनही चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र पाठवून यातील मुद्द्यांवर चर्चा करावी, वाटल्यास प्रत्यक्ष भेटून या मुद्द्यांचे गांभीर्य आणि उपाययोजनांबाबत माहिती देता येईल, असेही म्हटले आहे.