आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात एका दिवसात १४,४९२ नव्या कोरोनाबाधित आणि ३२६ मृत्यूंची नोंद झाली. गुरुवारी १२,२४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४, ५९,१२४ झाली असून बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्क्यांवर गेले आहे. एकूण रुग्णसंख्या ६,४३,२८९ वर गेली असून प्रत्यक्षात १,६२,४१९ रुग्ण उपचार घेत आहेत.
औरंगाबादेत ३२७ नवे रुग्ण, ११ मृत्यू; बीड ३, जालना जिल्ह्यात २ बळी
गुरुवारी मराठवाड्यात पुन्हा ११०१ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ३० बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ११, त्यापाठोपाठ उस्मानाबाद १०, परभणी ४, बीड ३, जालना २, हिंगोली - नांदेड प्रत्येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे. औरंगाबाद ३२७, बीड २२६, जालना ३८, लातूर १२४, नांदेड ११५, परभणी ८१ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १५३ पाॅझिटिव्ह आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या ११ मृत्यूंपैकी दोन रुग्ण हे अन्य जिल्ह्यांतील होते.
नागपुरात कोरोनाचा कहर; एकाच दिवसात तब्बल 989 नवे रुग्ण, ४६ जणांचा मृत्यू
नागपूर | नागपुरात गुरुवारी ९८९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि गेल्या चोवीस तासांत ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या पाच महिन्यांपैकी मागील ३० दिवसांमध्ये सुमारे १२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्या तुलनेत नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४९ टक्क्यांवर आले आहे. नागपुरात ९८९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. धक्कादायक म्हणजे गेल्या आठ दिवसांमध्ये नागपूर शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या आठ दिवसांत नागपुरात तब्बल ७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार ७२२ इतकी झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.