आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 2,487 नवीन रुग्णांसह एकूण आकडा 67,655 वर; आज 89 रुग्णांचा मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी 1,084 पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, राज्यात आतापर्यंत 28, 081 रुग्ण ठीक झाले
  • मागील 24 तासात राज्यामध्ये 99 रुग्णांचा मृत्यू, राज्यातील एकूण मृतांचा आकडा पोहचला 2 हजार 197 वर

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज(दि.31) राज्यात 2,487 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या 67,655 वर गेली आहे. तसेच, आज राज्यात 89 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या 2,286 वर पोहचली आहे. यासोबतच आज राज्यात 1,248 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासोबतच राज्यातील एकूण ठीक झालेल्यारुग्णांचा आकडा 29,339 वर गेला आहे.

शनिवारी राज्यात 2,940 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून 99 बाधितांचा मृत्यू झाला. शनिवारी 1,084 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले. 

मुंबईमध्ये सवलती देण्यावर पुढील 1-2 दिवसात निर्णय होईल

मुंबईमध्ये दुकाने आणि खासगी ऑफिस उघडण्याबाबत पुढील एक ते दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकार आणि बीएमसी सूट देण्याची घोषणा करेल. ई-कॉमर्स कंपन्यांना सर्व सामानांची विक्री करण्यासाठी सूट दिल्यानंतरच रिटेल दुकानदारांनाही दुकाने उघडण्याची परवानगी दिली जाईल.

ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्यामुळे 2 तासात 7 संक्रमितांचा मृत्यू

मुंबईच्या जोगेश्वरी रुग्णालयात शनिवारी फक्त 2 तासात 7 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार, ही  घटना शनिवारी झाली. नाव न सांगण्याच्या बोलीवर एका नर्सने सांगितले की, ‘‘असे दृष्य आम्ही आमच्या करिअरमध्ये कधीच पाहीले नाही. फक्त 2 तासात 7 रुग्णांचा मृत्यू झाला. इंडिकेटरमध्ये दिसत होते की, ऑक्सीजन कमी झाले आहे. रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. आम्ही काही करण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला.’’ या रुग्णालयात हलगर्जीपणामुळे मागील एका आठवड्यात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाचा ग्रोथ रेट 4.93 %

-बीएमसीने 22 मे पासून 28 मे दरम्यान, एका आठवड्यांची मुंबईतील कोरोनााच्या संक्रमणाची डेली ग्रोथ रेटचा संख्या जारी केली आहे. यानुसार, कोरोनाचा ग्रोथ रेट कमी होऊन 4.93 % झाला आहे. तर, यापूर्वी 21 ते 27 मे दरम्यान मुंबईत कोरोनाचा ग्रोथ रेट 5.17 % होता. मार्च आणि एप्रिलमध्ये कोरोनाचे प्रकरणे सर्वात कमी होते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणे वाढली.

-अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले की, मुंबईमध्ये कोरोनाचा डबलिंग रेट 20 दिवसांचा झाला आहे. कोरोना संक्रमणाचा सर्वात जास्त परिणाम झालेल्या धारावीमध्ये कोरोनाचा डबलिंग रेट 19 दिवसांचा आहे, तर वरळीमध्ये हा 21 दिवसांवर पोहचला आहे. मुंबईच्या 11 हॉटस्पॉटमध्ये 1500 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. याला कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

-कोरोनाचा जास्त परिणाम झालेल्या धारावी, वरळीमध्ये कोरोनाचा ग्रोथ रेट सर्वात कमी आहे. वरळीमध्ये 3.1 % आहे, तर धारावीमध्ये ग्रोथ रेट 3.6% आहे. याच प्रकारे भायखळामध्ये कोरोनाचा डेली ग्रोथ रेट 3.8 टक्के, माटुंगा, सायन कोळीवाडामध्ये 3.5, गोवंडीमध्ये 3.9 टक्के आणि अंधेरी पश्चिममध्ये 3.8 टक्के आहे.

कोरोना वॉरिअर्सला मिळेल 50 लाखांचा विमा

कोरोनाला रोखण्यात आणि उपचारात असलेल्या कोरोना वॉरिअर्सला 50 लाख रुपयांचा विमा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू असेल. शुक्रवारी सरकारने याबाबत आदेश जारी केली. कोरोना विरोधातील लढाईत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांचा विमा दिला जाईल. 

पुण्यात 194 डिस्चार्ज, 108 नवे रुग्ण

पुणे शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा या आजारातून बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. शनिवारी दिवसभरात 194 जणांना घरी सोडण्यात आले आहे, तर नव्याने 108 बाधित व्यक्ती सापडले आहेत, अशी माहिती महानगपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मागील दोन दिवसांत जवळपास दीड हजार जणांचे तपासलेल्या नमुन्यातून नवीन 108 बाधित व्यक्ती सापडले आहेत. शनिवारी दिवसभरात आणखीण बाराशे जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. एकीकडे बाधितांची संख्या शंभरपर्यंत खाली आल्यामुळे प्रशासनासह नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पहिल्यांदाच बाधितांपेक्षा घरी सोडलेल्यांची संख्या अधिक आहे. 194 जणांमध्ये 121 व्यक्ती नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. ससून रुग्णालयातील 7 आणि खासगी रुग्णालयातील 66 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ हजार 644 जणांना घरी सोडण्यात आले. सद्य:स्थितीत 2 हजार 248 बाधित व्यक्ती विविध उपचार घेत असून त्यातील 170 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात विलगीकरण कक्षात तरुणाची आत्महत्या

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला. यापैकी एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. नागपुरातून आलेला हा तरुण काही दिवसांमध्ये अलगीकरण कक्षामध्ये होता, असे पोलिसांनी सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवासी कक्षामध्ये आपल्या कुटुंबासह विलगीकरणात असणाऱ्या 40 वर्षीय नागरिकाचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे आकस्मिक मृत्यू झाला.

0