आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज 3007 रुग्णांची वाढ, 91 मृत्यू; कोरोनाबाधितांच्या बाबतीत महाराष्ट्राने चीनला टाकले मागे

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकडाउनमध्ये सुट मिळाल्यानंतर शेकडो लोक मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकसाठी आले होते. - Divya Marathi
लॉकडाउनमध्ये सुट मिळाल्यानंतर शेकडो लोक मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉकसाठी आले होते.
  • राज्यातील रुग्णसंख्या 82,968 वर, यामध्ये 42,600 अॅक्टीव्ह रुग्ण, 2969 लोकांचा मृत्यू

राज्यात आज 3 हजार 7 नव्या रुग्णांची वाढ झाली. यासोबत एकूण रुग्णसंख्या 85 हजार 975 वर पोहचली. कोरोना रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्राने चीनला देखील मागे टाकले. आज 91 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृतांचा आकडा 3060 वर गेला. एकूण रुग्णसंख्यापैकी 43 हजार 591 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात आतापर्यंत 5 लाख 37 हजार 124 चाचण्यात करण्यात आल्या. यातील एकट्या मुंबईत 2 लाख 12 हजार टेस्ट झाल्या आहेत. मुंबईतील संक्रमितांची संख्या 47 हजार 354 झाली आहे. तर 1577 जणांचा मृत्यू झाला. तसेच 2234 रुग्ण बरे झाले आहेत. 

महाराष्ट्रात 20 हजारांपेक्षा जास्त कैदी सोडले

ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील 60 तुरुंगातील 11 हजार कैद्यांना इमरजन्सी पेरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला. याआधीही 9671 कैद्यांना सोडले होते. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितले की, राज्यातील कारागृहांत एकूण 38 हजार कैदी आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी यातील 20 हजार कैदी बाहेर येऊ शकतात. याशिवाय 24 जिल्ह्यांच 31 तात्पुरते कारागृह उभारले आहेत. 

महाराष्ट्राचा रिकव्हरी दर 45.06% झाला 

रिपोर्ट्सनुसार, सध्या संपूर्ण राज्यात जवळपास 5 लाख 46 हजार 566 लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर 29 हजार 98 लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन केले. राज्यात आज रिकव्हरी दर 45.06% झाला असल्याचे आरोग्य विभागाने एका अहवालात म्हटले आहे. 

वैद्यकीय विद्यार्थी त्यांच्या खेड्यातील महाविद्यालयात देता येईल परीक्षा

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या खेड्यात किंवा जेथे ते शिकत आहेत तेथे कॉलेजमध्ये घेण्यात येऊ शकते. पहिला पेपर 15 जुलैला होईल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षा केंद्रांची वेळापत्रक आणि यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थी परीक्षा केंद्र बदलण्यासाठी अर्ज करू शकतात.

5 आयएएस अधिका्यांना खासगी रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली

मुंबई मनपा आयु्कत आयएस चहन यांनी खासगी रुग्णालयात लोकांना बेड उपलब्ध व्हावेत यासाठी 5 आयएएस अधिकाऱ्यांनाकडे जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये मदन नागरगोजे, अजित पाटील, राधाकृष्णन, सुशील खोडवेकर आणि प्रशांत नारनवरे यांचा समावेश आहे. रुग्णालयांनी कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध न केल्यास ईमेलद्वारे तक्रार नोंदवू शकतात.