आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा कहर:मे महिन्याच्या 17 दिवसांत राज्यात रुग्णसंख्येत तिपटीने वाढ, राज्यातील रुग्णसंख्या 11,506 वरून 33,053 वर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 16.33 वरून 23.25 टक्यांवर

तिसऱ्या लॉकडाऊनच्या कालावधीत राज्याच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली, हे दिलासादायक आहे. 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ४ ते १७ मे असा तिसरा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र मे महिन्यातील पहिल्या १७ दिवसांमध्ये दरदिवशी राज्यामध्ये सरासरी १ हजार २६७ रुग्णांची भर पडली आहे. १ मे रोजी राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५०६ होती. ती रविवार, दि.१७ मेपर्यंत ३३ हजार ५३ ए‌वढी झाली होती. ही वाढ २८७ टक्के अर्थात सुमारे तिप्पट वाढली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा यासाठी अधिक कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांचे मत अाहे.

राज्यात १ मेपर्यंत ११ हजार ५०६ पैकी १८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १६.३३ टक्के होते. लॉकडाऊन संपेपर्यंत बरे हाेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली असून ७६८८ जण कोरोनामुक्त झाले. रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण २३.२५ टक्के झाले अाहे.

दाट लोकवस्तीमुळे मर्यादा

८९% रुग्ण दाट लोकवस्त्यांत आहेत. दर चौकिमी परिसरात लोकसंख्येची घनता मुंबई (२० हजार), ठाणे (११.५ हजार) व पुणे (९ हजार) अशी आहे. लाॅकडाऊन नसता तर ही संख्या लाखाच्या घरात गेली असती. रुग्णसंख्या दुपटीचा वेग ३ दिवसांवरून १४ दिवसांवर येणे ही दिलासादायक बाब आहे. - डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी

ही परमोच्च बिंदूकडे वाटचाल

आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, लोक गांभीर्याने लॉकडाऊन पाळत नाहीत. ट्रेसिंग व टेस्टिंगमुळे निदानाचे प्रमाण वाढले आहे. या आठवड्यातील आलेखाची तीव्रता बघता आपण परमोच्च बिंदूकडे चाललो आहोत. त्यानंतर रुग्ण कमी होतील.

बातम्या आणखी आहेत...