आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज विक्रमी 5071 रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 47.2%; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • आतापर्यंत 56 हजार 49 रुग्णांची कोरोनावर मात, 72 तासांत 227 पोलिसांना कोरोना

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असताना आज एक सकारात्मक बातमी आली आहे. आज राज्यभरात 5 हजार 71 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये मुंबई मंडळात सर्वाधिक 4242 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 56 हजार 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दुसरीकडे मागील 72 तासांत 227 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यासोबत एकूण बाधिक पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 1388 वर पोहचली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 40 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 

29 मे रोजी 8391 रुग्णांचा दिला होता डिस्चार्ज 

याआधी 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे 15 दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठला. 

आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची मंडळनिहाय आकडेवारी 

आज सोडण्यात आलेल्या 5071 रुग्णांमध्ये मुंबई मंडळात 4242 (आतापर्यंत एकूण 39 हजार 976) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात 568 (आतापर्यंत एकूण 8430), नाशिक मंडळात 100 (आतापर्यंत एकूण 2365), औरंगाबाद मंडळ 75 (आतापर्यंत एकूण 1945), कोल्हापूर मंडळ 24 (आतापर्यंत एकूण 1030), लातूर मंडळ 11 (आतापर्यंत एकूण 444), अकोला मंडळ 22 (आतापर्यंत एकूण 1048), नागपूर मंडळ 29 (आतापर्यंत एकूण 811) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 47.2 टक्के आहे. त्यात दिवसंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...