आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे. राज्यात बुधवारी संक्रमणामुळे आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच मृतांचा आकडा 1,897 वर पोहचला आहे. यापूर्वी मंगळवारी 97 रुग्णांचा मृत्यू झाला.
बुधवारी सर्वात जास्त 33 मृत्यू एकट्या मुंबईत झाले. तर, ठाण्यात 16, जळगाव 10, पुणे 9, नवी मुंबई आणि रायगड 7-7, अकोला 6, औरंगाबाद 4, नाशिक आणि सोलापूर 3-3, सातारा 2 मृत्यू झाले. यासोबतच अहमदनगर, नागपुर, नंदुरबार, पनवेल आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 72 पुरुष आणि 33 महिला आहेत. यात 63% रुग्णांना डायबिटीज, हाय ब्लडप्रेशर आणि ह्रदयरोगासारखे आजार होते.
राज्यातील संक्रमितांचा एकूण आकडा 57 हजारांच्या जवळ
चिंतेची बाब म्हणजे, राज्यातील संक्रमितांची संख्या वेगाने वाढत आहे. बुधवारी 2,190 नवीन रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसोबत राज्यातील एकूण आकडा 56,948 वर पोहचला आहेत. यापैकी 37,125 अॅक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.
70-80% रुग्णात कोरोनाची लक्षणे नाहीत
महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी अजोय मेहता यांनी सांगितले की, राज्यात 70-80 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीयेत. तर, संक्रमितांचा डबलिंग रेट 3 दिवसावरुन 14 दिवसांवर आला आहे. मेहता यांनी पुढे सांगितले की, पूर्वी राज्यात दोनच टेस्टींग लॅब होत्या. पण, आता राज्यात 72 टेस्टींग लॅब आहेत.
राज्यात 24 तासांत 80 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू
कोरोनामुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आणखी ८० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत १८८९ कोरोना रुग्ण पोलिस कर्मचाऱ्यांशी संबंधित आहेत. तर आतापर्यंत २० पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत २ दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांशी संबंधित १३ केस सध्या अॅक्टिव्ह आहेत, तर ८३८ पोलिस कर्मचारी बरे झाले आहेत.
राज्यात सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यात कायदा व सुव्यवस्थेचे काम करणाऱ्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ लागला आहे. कोरोनाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या कोरोना वीरांना या धोकादायक विषाणूंची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.