आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज 2940 नव्या रुग्णांची नोंद, तर 99 मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 65 हजार 168 वर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
आशियातील सर्वात दाट वस्ती असलेल्या धारावीमध्ये मजुरांची पलायन सातत्याने सुरू आहे. शुक्रवारी कुटुंबासमवेत बसची वाट पाहणारी मुले. - Divya Marathi
आशियातील सर्वात दाट वस्ती असलेल्या धारावीमध्ये मजुरांची पलायन सातत्याने सुरू आहे. शुक्रवारी कुटुंबासमवेत बसची वाट पाहणारी मुले.
  • राज्यभरात आज 1084 रुग्णांना डिस्चार्ज, आजपर्यंत 28 हजार 81 रुग्ण कोरोनामुक्त

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज राज्यभरात 2940 नव्या रुग्णांची भर पडली. तर 99 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या 65 हजार 168 तर एकूण बळींची संख्या 2197 वर पोहोचली आहे. सुखद बाब म्हणजे आज 1084 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासोबत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 28 हजार 81 झाली आहे. राज्यात सध्या 34 हजार 881 अॅक्टीव्ह केसेस आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनारुग्णांचा डबलिंग रेट आता 15.7 दिवस आहे. मागील आठवड्यात कोरोनारुग्णांचा डबलिंग रेट 11 दिवस होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्यात सुधारणा दिसून आली आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील रिकव्हरी रेट 43.38% तर मृत्यू दर 3.37% आहे.

कोरोनाच्या लढाईत सामील कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा

कोरोना रोखण्यासाठी आणि उपचार करणार्‍या लोकांना 50 लाख रुपयांचा विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहील. शुक्रवारी शासनाने आदेश जारी केले. सेवेत असताना संबंधित कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत निधी देण्यात येईल. सर्व नगरपालिका संस्था आणि राज्य सरकारच्या पीएसयूमध्येही ही योजना लागू केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...