आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 10,221 रुग्ण बरे, 8,968 नवे, मराठवाड्यात 750 नवे रुग्ण, 14 जणांचा मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत सोमवारी कोरोना योद्ध्यांना महिलांनी राख्या बांधल्या.
  • मराठवाड्यात 750 नवे रुग्ण, 14 जणांचा मृत्यू

राज्यात सोमवारी १०,२२१ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.७६ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये ८ हजार ९६८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर २६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ४ लाख ५० हजार १९६ वर गेली आहे. त्यापैकी २ लाख ८७,०३० रुग्ण बरे झाले आहेत.

मराठवाड्यात ७५० नवे रुग्ण, १४ जणांचा मृत्यू, औरंगाबाद ३४१, जालना ४२, नांदेड २०३ रुग्ण
औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या २४ तासांमध्ये ७५० नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. तर एकूण १४ बाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ३४१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यात तब्बल २०३ रुग्ण वाढले आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यात ७, परभणी २६, लातूर ७३, उस्मानाबाद ९, बीड ४९ तर जालना जिल्ह्यात ४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ३ नांदेड जिल्ह्यात ४, बीड २, लातूर ३, उस्मानाबाद १ तर परभणी जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

नगर : जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६ हजार पार
नगर | जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने सोमवारी सहा हजारांचा टप्पा आेलांडला. २४ तासांत ४३५ नवे रुग्ण आढळले. रुग्णांची एकूण संख्या ६,३४६ झाली आहे.

0