आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:आज 5537 नवीन रुग्ण आढळले तर 198 रुग्णांचा मृत्यू, राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट 18.16%; एकूण रुग्णसंख्या 1 लाख 80 हजार

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासांत 2243 रुग्णांची कोरोनावर मात, आतापर्यंत 93 हजार 154 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात बुधवारी संध्याकाळी कोरोनाच्या विक्रमी 5537 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि 198 मृत्यू झाले. हे दोन्ही आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधित आकडे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेक दिवसांपासून दररोज पाच हजार रुग्ण सापडत आहेत. राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 1 लाख 80 हजार 298 झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 8053 जणांचा मृत्यू झाला. 

बुधवारी संध्याकाळपर्यंत एकूण 9 लाख 92 हजार 723 जणांची चाचणी झाली. सध्या राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट 18.16% आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत 93 हजार 154 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मागील 24 तासांत 2243 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 

मुंबईत कलम 144 लागू 

कोरोना संसर्गाचे वाढती प्रकरणे पाहता बुधवारी रात्रीपासून मुंबईत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार कलम 144 अंतर्गत मुंबईच्या कंटेनमेंट झोनमध्ये एका ठिकाणी एकापेक्षा जास्त व्यक्ती थांबणार नाहीत. इमरजेंसी सर्विसमधील कर्मचारी आणि सरकारी कार्यलयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू नसेल. याशिवाय फळ-भाज्या आणि मेडिकल स्टोर, बँक, इलेक्ट्रिसिटी ऑफिस, स्टॉक एक्सचेंज, पेट्रोल पंप, मीडिया, पोर्ट, ऑनलाइन होम डिलीवरी करणाऱ्यांनाही हा नियम लागू नसेल. आज रात्री 12 वाजेपासून हा आदेश लागू होईल आणि 15 जुलैच्या रात्री 12 पर्यंत असेल.

मुंबईत आतापर्यंत 44 हजार रुग्ण ठीक झाले

मंगळवारी मुंबईत 903 नवीन रुग्ण सापडले, यासोबतच येथील संक्रमितांचा आकडा 77,197 झाला. बृह्नमुंबई महानगरपालिके (बीएमसी) ने सांगितले की, मंगळवारी 93 रुग्णांच्या मृत्यूसोबत मृतांचा एकूण आकडा 4,554 झाला आहे. बीएमसीने सांगितल्याप्रमाणे सध्या शहरात 44,170 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 28,473 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील एकूण रुग्णसंख्या 1 लाख 74 हजार

राज्यात बुधवारी सकाळपर्यंत 4,878 नवीन रुग्ण समोर आले. यासोबतच राज्यातील एकूण रुगणसंख्या 1,74,761 झाली आहे. तसेच, 245 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील 7855 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

350 लोकल ट्रेन्स चालतील

कोरोनादरम्यान जाहीर झालेल्या अनलॉक-2मध्ये मुंबईत बुधवारपासून 350 लोकल ट्रेन चालवल्या जातील. परंतू या ट्रेन्समध्ये फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी असेल. रेल्वे मंत्रालयाने म्हटले की, महाराष्ट्र सरकार, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमा शुल्क, पोस्टल, राष्ट्रीयकृत बँक, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या स्टाफसह महत्वाच्या विभागातील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येईल.

ग्रामीण भागात मोफत औषध दिले जाईल

रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागातील जवळपास 5 कोटी लोकांना मोफत आर्सेनिक एल्बम आणि आयुर्वेदिक औषध दिले जाईल. मंगळवारी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत घोषणा केली. मुश्रीफ यांनी सांगितले की, औषध खरेदी करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला असेल. त्यांनी याबाबत आदेशही दिले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser