आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात मंगळवारी 11,088 रुग्णांची नोंद, तर 256 मृत्यू; 10,014 रुग्ण बरे होऊन घरी गेले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.79 टक्के, मंगळवारी 10,014 रुग्ण बरे होऊन घरी गेले

राज्यात मंगळवारी 10,014 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 68 हजार 435 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.79 टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी 11,088 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, तर 256 मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यू दर 3.42 टक्के झाला. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी डॉ.मेधा यांनाही कोरोनाची लागण झाली. सोमय्या यांनी सोमवारी टि्वट करुन त्याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...