आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील रुग्णसंख्या 10 लाख पार, शुक्रवारी 24,886 नवीन रुग्णांची नोंद, 393 मृत्यू

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील एकूण रुग्णसंख्या 10,15,681, आतापर्यंत 28,724 जणांचा बळी

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 10 लाख पार झाला. शुक्रवारी 24 हजार 886 नवीन रुग्ण आढळले. तर 393 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णसंख्या 10 लाख 15,681 झाली. राज्यातील मृतांची एकूण संख्या आता 28,724 झाली असून सध्या 2 लाख 71,566 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत एकूण 7 लाख 15,023 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचा मृत्यू दर हा 2.83 टक्क्यांवर वर गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...