आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:राज्यात 63,294 काेराेना रुग्णांचा नवा उच्चांक, तर मराठवाड्यात रविवारी 7 हजार 454 पॉझिटिव्ह

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात रविवारी ६३,२९४ नव्या कोरोनाबाधित आणि ३४९ मृत्यूची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ३४,००८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ५ लाख ६५,५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची एकूण संख्या ३४ लाख ७ हजार २४५ वर गेली आहे. २७,८२,१६१ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ८१.६५ आहे.

नांदेडमध्ये सर्वाधिक १८५९ नवे रुग्ण : मराठवाड्यात रविवारी ७ हजार ४५४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून १०७ जणांचा मृत्यू झाला. ५०९१ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मराठवाड्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे - कंसात मृतांचा आकडा : औरंगाबाद १,२८० (२९), नांदेड १,८५९ (२७), जालना ४९५ (९), परभणी ४०५ (२०), हिंगोली १३३ (५), लातूर १,६५७ (२७), उस्मानाबाद ५७३ (३), बीड १०६२ (११)

इतर राज्यांतील स्थिती : छत्तीसगडमध्ये उत्पादित ८० टक्के ऑक्सिजन रुग्णालयांना देणार
छत्तीसगडमध्ये उत्पादित होणारा ८०% आॅक्सिजन आरोग्यसेवेसाठी रुग्णालयांना दिला जाईल. आरोग्य विभागाने याबाबतची अधिसूचना काढली आहे. यात ऑक्सिजन उत्पादकांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली रच उर्वरित २०% ऑक्सिजनही रुग्णालयांनाच दिला जाईल.

- मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लॉकडाऊनची शक्यता नाकारली आहे. त्यांनी सांगितले की, लॉकडाऊन कोरोनावरील तोडगा नाही. स्थानिक पातळीवर संचारबंदी किंवा इतर प्रतिबंध लावता येतील.

- गुजरातच्या सुरतमधील रात्रीची संचारबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेला सुरत गुजरातमधील पहिला जिल्हा आहे.

बातम्या आणखी आहेत...