आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील आकडा 23 हजार 401 वर; आज 36 रुग्णांचा मृत्यू तर 587 कोरोनामुक्त

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 2 लाख 44 हजार 327 लोक स्वत:च्या घरी क्वाॅरंटाइन

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा वाढत आहे. आज राज्यात 1230 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 23 हजार 401 वर पोहचला असून आज 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आतापर्यंत राज्यात 868 रुग्ण दगावले आहेत. सध्या राज्यात 17747 अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरू असून,  4786 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही आकडेवारी https://www.covid19india.org/ वेबसाइटनुसार आहे.

राज्यात 2 लाख 44 हजार 327 लोक स्वत:च्या घरी क्वाॅरंटाइन असून 14 हजार 465 लोक विविध संस्थांत क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1237 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून त्यांनी 55.61 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. 

पुण्यातील 69 कंटेनमेंट झोन पूर्णपणे सील

सोमवारपासून पुणे महापालिका सीमेतील 69 कंटेनमेंट भागात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथील लोक सोशल डिस्टेंन्सिंग आणि लॉकडाऊनच्या इतर नियमांचे पालन करत नाहीयेत. पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय आढावा बैठकीनंतर घेण्यात आला. पुणे देशातील सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक आहे. शनिवारी येथे संक्रमणाची 2, 732 प्रकरणे समोर आली आहेत. यातील 2,380 पुणे महापालिका सीमेतील आहेत. 

राज्य सरकार देणार रेल्वे भाडे 

महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटांचे पैसे राज्य सरकार देणार आहे. यासंदर्भात जारी केलेल्या आदेशानुसार 17 मे पर्यंत जे कामगार प्रवासी खर्च करू शकत नाहीत त्यांच्या प्रवासाचा एकूण खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिला जाईल. तसेच इतर राज्यांत अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही ही सुविधा उपलब्ध असेल.

बातम्या आणखी आहेत...