आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 15 हजार 356

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यात 10 हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून आले. मागील 24 तासात 8522 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दिलासादायक बाब म्हणजे ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या 15 हजार 356 होती. 187 रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत 77.6 लाख लोकांची तपासणी झाली आहे. यामध्ये 15 लाख 43 हजार 837 लोक संक्रमित आढळून आले. सध्या 2 2 लाख 5 हजार 415 रुग्णांवर उपचार सुरु असून 12 लाख 97 हजार 252 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना संक्रमणामुळे आतपर्यंत 40 हजार 701 लोकांचा मृत्यू झाला आहे.