आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 39,923 नवे कोरोना रुग्ण, 695 मृत्यू; 53 हजार पूर्ण बरे झाले; विदर्भात 154 जणांचा मृत्यू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शुक्रवारी एकूण ३९,९२३ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ६९५ मृत्यूंची नोंद झाली. दरम्यान, एका दिवसात ५३,२४९ रुग्ण पूर्ण बरे होऊन परतले आहेत. एकूण रुग्णसंख्या ५३,०९,२१५ झाली आहे.

मराठवाड्यात ४५२४ रुग्ण, १३९ मृत्यू
औरंगाबाद | शुक्रवारी ६५१८ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून ४५२४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, १३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या मराठवाड्यात ४२ हजार ५८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे कंसात मृतांची संख्या : औरंगाबाद ६६५ (३३), जालना ९८५ (५), परभणी ४५८ (१६), हिंगोली ७८ (५), नांदेड २०८ (१३), उस्मानाबाद ४५८ (१५), बीड १११२ (२२).

विदर्भात 154 जणांचा मृत्यू
अमरावती| विदर्भात १५४ मृत्यू, तर ७ हजार ७८१ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील १०२ जणांमध्ये नागपूरच्या ७०, भंडारा २, चंद्रपूर १९, गोंदिया ६, वर्धा जिल्ह्यातील ५ जणांचा समावेश आहे. तसेच पश्चिम विदर्भात कोरोनामुळे ५२ जणांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...