आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 5 हजार 71 रुग्णांना डिस्चार्ज, 178 बाधितांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 10,744

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात कोरोनामुक्तांचा आकडा आतापर्यंत 56 हजार 49
Advertisement
Advertisement

राज्यभरात सोमवारी ५ हजार ७१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. एकट्या मुंबई मंडळात सर्वाधिक ४,२४२ रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्तांचा आकडा आतापर्यंत ५६ हजार ४९ झाला आहे. साेमवारी राज्यात २,७८६ नवीन रुग्ण, तर १७८ मृत्यूंची नोंद करण्यात आली. आता काेरोनाबाधितांचा आकडा तब्बल १ लाख १०,७४४ तर बळींची संख्या ४,१२८ वर पोहोचली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ५०.६१% तर कोरोना मृत्युदर ३.७०% इतका आहे.

मराठवाड्यात दिवसभरात ९२ नवे कोरोनाबाधित

मराठवाड्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून सोमवारी ९२ रुग्णांची भर पडली. यात औरंगाबादेत सर्वाधिक ६९ रुग्णांची वाढ झाली असून सोमवारी जालना जिल्ह्यात १४, लातूर ७ आणि बीड जिल्ह्यात दोन रुग्ण वाढले. औरंगाबादेत ८ तर लातूर जिल्ह्यातील दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

जालन्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील एक अधिकारीही पॉझिटिव्ह आला आहे. तर राज्य राखीव पोलिस दलातील तीन जवानांचाही यात समावेश आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने लातूर जिल्ह्यातील मृतांची संख्या १० झाली.

आैरंगाबादेत ६९ पाॅझिटिव्ह; ८ मृत्यू

साेमवारी दिवसभरात ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २८२५ झाली आहे. तर दिवसभरात ८ जणांचे मृत्यू झाल्याने बळींची संख्या १५८ वर गेली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत साेमवारी रुग्णसंख्येचा आलेख घसरलेला असला तरी बळींचे प्रमाण मात्र कमी हाेत नसल्याचे दिसून आले आहे.

आैरंगाबाद शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. पूर्वी दाेन-चार रुग्ण सापडत हाेते, मात्र आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या २१२ पर्यंत गेली आहे. शहराजवळील वाळूज, बजाजनगरमध्ये तर माेठ्या प्रमाणावर संख्या वाढत असल्यामुळे त्याला अटकाव घालण्यासाठी आता उपजिल्हाधिकारी भारत कदम या स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्याची या भागासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

Advertisement
0