आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 29,100 कोरोनाग्रस्त; मृतांची संख्या 1068, एकूण 6,564 रुग्ण बरे होऊन घरी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात रुग्ण दुपटीचा वेग 11 दिवसांवर गेला आहे

राज्यात शुक्रवारीही नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दीड हजारचा पल्ला पार केला. १,५७६ नव्या रुग्णांसह एकूण रुग्णांची संख्या २९,१०० वर जाऊन पोहोचली आहे. मृतांच्या संख्येतही गुरुवारपेक्षा पाचने वाढ होऊन ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील ३४, पुणे ६, अकोला शहर २, कल्याण-डोंबिवली २, धुळे २, पनवेल, जळगावात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. यात २९ पुरुष व २० महिलांचा समावेश आहे. राज्यातील मृतांची एकूण संख्या १०६८ झाली आहे. कोविड पोर्टलनुसार राज्यात रुग्ण दुपटीचा वेग ११ दिवसांवर गेला आहे. 

रुग्णांचा तपशील - मुंबई मनपा १७६७१, ठाणे १८९, ठाणे मनपा १३०२, नवी मुंबई ११७७, कल्याण डोंबिवली ४४४, उल्हासनगर ८६, भिवंडी निजामपूर ४१, मीरा भाईंदर २६०, पालघर ४२, वसई विरार ३२१, रायगड २१२, पनवेल मनपा १८०, नाशिक मंडळ १२३८, पुणे मंडळ ३९७२, कोल्हापूर मंडळ १६२, औरंगाबाद मंडळ ८७१, लातूर मंडळ ९६, अकोला मंडळ ४५२, नागपूर ३४३, इतर राज्ये ४१.

राज्यभरात : २१ हजार ४६७ अॅक्टिव्ह रुग्ण

- राज्यात शुक्रवारी ५०५ रुग्ण घरी परतले. बरे हाेणाऱ्यांचा एकूण आकडा ६,५६४ वर गेला. सध्या २१४६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

- राज्यात २ लाख ५०,४३६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ लाख २१,३३६ जणांचे प्रयोगशाळा अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. 

- सध्या राज्यात विविध जागी तीन लाख २९,३०२ नागरिक होम क्वाॅरंटाइनमध्ये आहे. दुसरीकडे, १६ हजार ३०६ जणांना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...