आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख पार; शनिवारी 12,822 रुग्णांची वाढ, 275 जणांचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील रिकव्हरी रेट 67.26 % तर मृत्यू दर 3.45 % आहे

राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 3 लाख 38 हजार 362 वर गेली आहे. शुक्रवारी 12,822 नवे रुग्ण तर, 11,081 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तसेच 275 मृत्यूंची नोंद करण्यात आली. एकूण रुग्णसंख्या 5 लाख 3 हजार 084 तर बळींची संख्या 17,367 वर गेली आहे. राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 48 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 67.26% तर मृत्युदर 3.45% इतका आहे.

राज्यात सध्या 9 लाख 89 हजार 612 व्यक्ती स्वतंत्र विलगीकरण असून 35 हजार 626 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरन मध्ये आहेत.

हॉकीच्या राष्ट्रीय कॅम्पमध्ये कॅप्टनसह ४ कोरोना पॉझिटिव्ह
बंगळुरू | भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग, सुरेंदर कुमार, जसकरणसिंग आणि वरुण कुमार या चौघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या ते साईच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय शिबिरात आहेत. पुरुष व महिला संघाचे सराव शिबिर रद्द झाल्यानंतर गेल्या महिन्यात उर्वरित खेळाडू घरी परतले आहेत. ते सर्व क्वाॅरंटाइन आहेत.

बातम्या आणखी आहेत...